दोन दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:30 AM2018-04-10T00:30:21+5:302018-04-10T00:30:43+5:30

शहरात सोमवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. किमान अर्धा तास तरी पाऊस सातत्याने झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस बरसतो आहे.

Rainfall in district, including Nagpur city since two days | दोन दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात पाऊस

दोन दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देसायंकाळी होते वातावरण ढगाळ : उकाड्यापासून सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : शहरात सोमवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. किमान अर्धा तास तरी पाऊस सातत्याने झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस बरसतो आहे.
हवामान खात्यानुसार सायक्लोनिक सर्क्युलेशनचा परिणाम विदर्भावर झाला आहे. त्याच कारणामुळे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस बरसतो आहे. असे असले तरी सकाळापासून उन्हाचा तडाखाही चांगलाच जाणवत आहे. दुपारी अचानक आकाशात ढग दाटून येतात, त्यामुळे ऊन-सावलीचा खेळ सुरू होतो. सायंकाळ होता होता वाऱ्यांचा वेग वाढतो, विजांचा कडकडाटही सुरू होतो. हवामान खात्याच्या निर्देशानुसार तीन दिवस असेच वातावरण राहणार आहे. सोमवारी कार्यालय सुटण्याच्या वेळेतच पाऊस बरसल्याने अनेकांना पावसात भिजावे लागले. सोमवारी दिवसाच्या तापमानात ४.१ डिग्री सेल्सिअसची वाढ होत ३८.९ डिग्री सेल्सिअसची नोंद करण्यात आली. जेव्हा की रात्रीचे तापमान ४ डिग्रीने घसरून २०.२ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होते.

Web Title: Rainfall in district, including Nagpur city since two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.