नागपुरात पावसाने सरासरी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 07:40 PM2019-09-19T19:40:13+5:302019-09-19T19:40:58+5:30
सप्टेंबर महिना लागताच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जलाशये ओव्हरफ्लो झाली. नागपुरात वर्षभरात जितका पाऊस होतो. त्याची सरासरी आताच ओलांडली . आतापर्यंत नागपुरात १०८१.७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाच्या लहरीपणामुळे यंदा पावसाचा बॅकलॉग भरेल की नाही, असे वाटत होते. भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामनाही करावा लागला इतकी परिस्थिती भयावह होती. परंतु सप्टेंबर महिना लागताच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जलाशये ओव्हरफ्लो झाली. इतकेच नव्हे तर नागपुरात वर्षभरात जितका पाऊस होतो. त्याची सरासरी आताच ओलांडली आहे. आतापर्यंत नागपुरात १०८१.७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागानुसार सप्टेंबर महिन्याच्या उर्वरित दिवसात आणखी पावसाची शक्यता आहे.
यावर्षी मान्सूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने ज्या प्रकारे दडी मारली त्यामुळे यावर्षी पुरेसा पाऊस होणार नाही, असेच वाटत होते. जलाशये कोरडी राहतील आणि उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यताही वर्तविली जात होती. परंतु सप्टेंबर महिन्यातील तिसरा आठवडा नागपूरकरांसाठी महत्त्वाचा ठरला. या आठवड्यात इतका पाऊस झाला की, नागपूरसह विभागातील सर्वच महत्त्वाची जलाशये ओव्हरफ्लो झाली. नागपूर शहरात संपूर्ण पावसाळ्यात सरासरी १०७४ मि.मी. इतका पाऊस होतो. परंतु १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता नागपुरात सरासरी १०८१.७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत सरासरीपेक्षा ७.७. मि.मी. अधिक पाऊस नागपुरात झालेला आहे. हवामान विभागानुसार येणाऱ्या काही दिवसात आणखी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा किती अधिक पाऊस होतो, हे पाहावे लागणार
ऑगस्ट-सप्टेंबरपासून दिलासा
विशेष म्हणजे यंदा नागपुरात सरासरी १०७४ इतका पाऊस पडेल, असे कुणालाच वाटले नाही. सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याने सर्वच चिंतेत होते. दरम्यान ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोर धरला. त्यामुळे नागपुरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकला.