रेन वॉटर हार्वेस्टिंग; नागपुरातील रामदासपेठेतील नागरिकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:48 PM2018-03-30T12:48:30+5:302018-03-30T12:48:39+5:30

रामदासपेठ येथील जुन्या गृह प्रकल्पांत राहणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेतला आहे. रामदासपेठ प्लॉट ओनर्स व रेसिडेंटस् असोसिएशनच्या नेतृत्वाखाली १२० गृह प्रकल्पांत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Rainwater Harvesting; Initiative of citizens of Ramdaspeth in Nagpur | रेन वॉटर हार्वेस्टिंग; नागपुरातील रामदासपेठेतील नागरिकांचा पुढाकार

रेन वॉटर हार्वेस्टिंग; नागपुरातील रामदासपेठेतील नागरिकांचा पुढाकार

Next
ठळक मुद्दे १२० गृह प्रकल्पांचा समावेश करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगाने घटत असलेली भूजल पातळी व सतत वाढत असलेले जल प्रदूषण या बाबी लक्षात घेता रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी वाचविणे) अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे महापालिकेने नवीन गृह प्रकल्पांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावणे बंधनकारक केले आहे. असे असले तरी रामदासपेठ येथील जुन्या गृह प्रकल्पांत राहणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेतला आहे. रामदासपेठ प्लॉट ओनर्स व रेसिडेंटस् असोसिएशनच्या नेतृत्वाखाली १२० गृह प्रकल्पांत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
असोसिएशनचे सचिव सीए जुल्फेश शाह यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावल्यानंतर पावसाच्या पाण्याचा उपयोग करता येईल. त्यामुळे वीज व पाणी बिलाची बचत होईल. तसेच, मनपाकडून मालमत्ता करात सूट मिळेल. प्रत्येक प्रकल्पात ही सिस्टीम लावण्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येणार आहे.
या उपक्रमासाठी मनपाचे सहकार्य घेतले जाणार आहे. नागरिकांनी उपक्रमात सहभागी व्हावे याकरिता प्रतिज्ञापत्र तयार केले जात आहे. तसेच, पुढील तीन महिने जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जाणार आहेत. आगामी पावसाळ्यात रामदासपेठला शहरातील आदर्श रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमचे क्षेत्र म्हणून ओळख निर्माण करून देण्याचे लक्ष्य आहे.

८ एप्रिल रोजी सभा
रेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात ८ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता रामदासपेठेतील दगडी पार्क येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेत महापौर नंदा जिचकार, जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके, नगरसेवक निशांत गांधी, उज्ज्वला शर्मा, सुनील हिरणवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. याप्रसंगी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्याला मनपाद्वारे मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली जाईल. असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप सराफ, सचिव सीए जुल्फेश शाह व प्रकाश सोनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Rainwater Harvesting; Initiative of citizens of Ramdaspeth in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस