मेट्रो पुलावरून पावसाच्या पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:05 AM2020-06-17T00:05:58+5:302020-06-17T00:08:28+5:30

अजनी चौकातून सोनेगाव पोलीस ठाण्याकडे जाणाºया डबलडेकर पुलावरून पावसाचे पाणी जास्त प्रमाणात रस्त्यावर गळत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.

Rainwater leak from metro bridge | मेट्रो पुलावरून पावसाच्या पाण्याची गळती

मेट्रो पुलावरून पावसाच्या पाण्याची गळती

googlenewsNext
ठळक मुद्देड्रेनेज सिस्टिमचे बांधकाम अपूर्ण : वर्धा मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : अजनी चौकातून सोनेगाव पोलीस ठाण्याकडे जाणाºया डबलडेकर पुलावरून पावसाचे पाणी जास्त प्रमाणात रस्त्यावर गळत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. रविवारी आणि सोमवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे महामेट्रोच्या कामाची पोल खुलली आहे. लॉकडाऊनच्या काळात बांधकाम बंद होते. ड्रेनेज सिस्टिमचे काम अपूर्ण असल्यामुळेच पाण्याचा धारा रस्त्यावर पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वर्धा रोडवरील डबलडेकर पूल आॅगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अनलॉकमध्ये पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. पण कामाला अजूनही वेग आलेला नाही. पुलावरून वाहतूक केव्हा सुरू होणार, यावरही अनिश्चितता आहे. बांधकामासोबतच पुलावरून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज सिस्टिमचे कामही अपूर्ण आहे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही, याकडे महामेट्रोला लक्ष देण्याची गरज आहे. या कामासाठी वर्धा रोडवर अनेक महिने वाहतूक बंद होती. महामेट्रोच्या कामाला नागरिकांनीही सहकार्य केले. पण महिन्याचे काम वर्षावर जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. मेट्रोच्या अन्य पुलावरूनही रस्त्यावर पाण्याच्या धारा वाहत असल्याच्या घटना रविवारी आणि सोमवारी घडल्या आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

पाईपलाईनचे काम लवकरच पूर्ण होणार
वर्धा मार्गावरील डबलडेकर पुलांतर्गत उज्ज्वलनगर येथील पुलाचे काम लॉकडाऊनमुळे अपूर्ण आहे. अनलॉकमध्ये काम सुरू झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पावसाचे पाणी पुलावरून थेट पाईपलाईनद्वारे वाहून जाईल. रस्त्यावर पाणी पडणार नाही. कामाच्या पूर्णत्वानंतर डबलडेकर पूल ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट कम्युनिकेशन)

Web Title: Rainwater leak from metro bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.