पावसाचे पाणी घरात शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:12 AM2021-09-15T04:12:38+5:302021-09-15T04:12:38+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : दीर्घ प्रतीक्षेनंतर रामटेक तालुक्यात साेमवारी (दि. १३) मध्यरात्री मुसळधार पाऊस बरसला. पावसाचे पाणी याेग्यरीतीने ...

Rainwater seeped into the house | पावसाचे पाणी घरात शिरले

पावसाचे पाणी घरात शिरले

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : दीर्घ प्रतीक्षेनंतर रामटेक तालुक्यात साेमवारी (दि. १३) मध्यरात्री मुसळधार पाऊस बरसला. पावसाचे पाणी याेग्यरीतीने वाहून जाणारी व्यवस्था कुचकामी ठरल्याने महादुला व गुरुकुल नगरातील राेडवर पाणी तुंबले आणि नागरिकांच्या घरात शिरल्याने त्यांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली. त्यामुळे अनेकांच्या घरांमधील जीवनावश्यक वस्तू व धान्य भिजल्याने माेठे नुकसान झाले.

रामटेक तालुक्यात सर्वदूर साेमवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा जाेर मंगळवारी (दि. १४) सकाळी ८ वाजेपर्यंत कायम हाेता. या पावसाचा सर्वाधिक फटका रामटेक तालुक्यातील महादुला आणि शीतलवाडी-परसाेडा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुरुकुल नगरातील नागरिकांना बसला. पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने ते माेठ्या प्रमाणात रस्त्यांवर तुंबले आणि घरांमध्ये शिरायला सुरुवात झाली.

पाणी घरात शिरत असल्याचे लक्षात येताच या दाेन्ही ठिकाणच्या नागरिकांची तारांबळ उडाली. त्यांनी सुरुवातीला घरातील साहित्य सुरक्षित राहावे म्हणून ते खाटा, दिवाण व काेठींवर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, फारसा उपयाेग झाला नाही. गुरुकुलनगर गवळण नाल्याच्या काठी वसले आहे. या नाल्यातील पाण्याचा प्रवाह पूर्ण क्षमतेने वाहून अडचणी निर्माण झाल्याने या भागात पाणी साचले हाेते. महादुला गावालगत नाला असून, पावसाचे पाणी याच नाल्यातून वाहात जाते. हा नाला उंचावर असून, गाव सखल भागात वसले आहे. त्यामुळे महादुला येथे नागरिकांना नेहमीच मुसळधार पावसाचा फटका बसताे.

पाणी घरात शिरल्याने घरातील संपूर्ण साहित्य, धान्य, रासायनिक खते, कपडे भिजले. संपूर्ण रात्री जागून काढावी लागली. यात माेठे आर्थिक नुकसान झाले अशी माहिती महादुला येथील धनराज भाेस्कर, प्रकाश भाेस्कर, विजय सहारे, कल्पना शंभरकर यांनी दिली. या गावाचा काही काळ इतर गावाशी संपर्क तुटला हाेता. हीच परिस्थिती गुरुकुल नगरात उद्भवली हाेती. तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गुरुकुल नगराची पाहणी केली. त्यांनी लगेच जेसीबी बाेलावून गवळण नाल्यातील कचरा साफ केला. त्यानंतर या भागातील साचलेले पाणी कमी व्हायला सुरुवात झाली हाेती. महादुला येथे मात्र दिवसभर पाणी साचून हाेते.

...

सरासरी ८४.८५ मिमी पावसाची नाेंद

रामटेक तालुक्यातील महसूल विभागाच्या चारही मंडळात अवघ्या पाच तासात सरासरी ८४.८५ मिमी पाऊस काेसळला. यात सर्वाधिक पावसाची नाेंद मुसेवाडी मंडळात करण्यात आली. तालुक्यातील रामटेक मंंडळात ९२ मिमी, नगरधन मंडळात ६५.२ मिमी, देवलापार मंडळात ६२.२ मिमी तर मुसेवाडी मंडळात १२० मिमी पाऊस बरसला. तालुक्यात आतापर्यंत ९३७.७५ मिमी पाऊस बरसला आहे.

...

नाले ठरताहेत डाेकेदुखी

गुरुकुल नगरातील गवळण नाल्याला सुरक्षा भिंत बांधली असली तरी ती या पावसामुळे कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले. या भिंतीच्या बांधकामावर केलेला खर्च वाया गेल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. या नाल्याची नियमित साफसफाई केली जात नसल्याने पाण्याचा प्रवाह कचऱ्याला अडताे व ही समस्या उद्भवते. महादुला येथील नाला गावाच्या तुलनेत थाेडा उंचावर आहे. या नाल्याचे रुंदीकरण व साफसफाई करणे आवश्यक आहे. गावातील पावसाच्या पाण्याची याेग्य विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरुपी उपाययाेजना करणे आवश्यक आहे.

Web Title: Rainwater seeped into the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.