नागपुरात हिवाळ्याच्या दिवसात पावसाळी फिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 11:43 PM2021-01-04T23:43:32+5:302021-01-04T23:44:50+5:30

weather changed गेल्या १२ तासांत बदललेल्या हवामानामुळे नागपूरसह विदर्भातील बहुतेक सर्व जिल्ह्यांतील वातावरण बदलले. नागपुरात तर सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान शहरात तुरळक पावसानेही हजेरी लावली. यामुळे ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरणाचा फिल नागपूरकरांनी अनुभवला. दिवसभर असेच वातावरण होते.

Rainy feel on a winter day in Nagpur | नागपुरात हिवाळ्याच्या दिवसात पावसाळी फिल

नागपुरात हिवाळ्याच्या दिवसात पावसाळी फिल

googlenewsNext
ठळक मुद्देदिवसभर ढगाळ वातावरण : तुरळक पावसाची हजेरी; सायंकाळनंतर गारठा वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या १२ तासांत बदललेल्या हवामानामुळेनागपूरसह विदर्भातील बहुतेक सर्व जिल्ह्यांतील वातावरण बदलले. नागपुरात तर सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान शहरात तुरळक पावसानेही हजेरी लावली. यामुळे ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरणाचा फिल नागपूरकरांनी अनुभवला. दिवसभर असेच वातावरण होते.

सकाळपासूनच नागपुरातील नभोमंडलात ढग दाटलेले होते. रात्री थंडीही बऱ्यापैकी पडली. सकाळी काही वेळ सूर्यदर्शन झाले; मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे शहरातील हवामानाचा एकंदर नूर पार पालटून गेला. वेधशाळेने घेतलेल्या नोंदीनुसार, शहरात गेल्या २४ तासांमध्ये कमाल तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. नागपुरातील पारा दिवसभरात ०.५ अंशाने खालावला होता. हवेतील गारवा आणि ढगाळलेल्या पावसाळी वातावरणामुळे दिवसा थंडी जाणवत होती. मागील वर्षी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरात पावसाने हजेरी लावली होती. यंदा नववर्षाला पाऊस आला नसला तरी चार दिवस विलंबाने त्याने तुरळक स्वरूपात का होईना, पण हजेरी लावली. या वातावरणामुळे शहरातील आर्द्रता सकाळी ७९ टक्के होती. मात्र, सायंकाळी त्यात घट होऊन ५६ टक्के झाली.

विदर्भात सोमवारी गडचिरोलीतील पारा सर्वाधिक खालावला होता. तिथे ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर यवतमाळातील तापमान १७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. अमरावतीमधील कमाल तापमानात २.३ अंशांची घट होऊन तिथे १६.४ अंश तापमान नोंदविण्यात आले. यवतमाळमध्ये १.५ अंशाने तापमान वाढून १७.५ अंशांची नोंद करण्यात आली.

नागपूर, गोंदियात दृष्यता घटली

सोमवारी सकाळी नागपूर आणि गोंदियात धुके दाटले होते. यामुळे दृष्यता घटली. १.०२ किलोमीटर दृष्यथेची नोंद या दोन्ही ठिकाणी झाली. त्या खालोखाल वर्धा आणि वाशिममध्येही धुके पसरले होते. यामुळे तिथे २.०४ किलोमीटर दृष्यतेची नोंद झाली. अकोला, अमरावती, गडचिरोली, वाशिम येथे मात्र दृष्यता चांगली होती. ४.१० किलोमीटर दृष्यतेची नोंद या ठिकाणी झाली.

हरभरा, तुरीचे नुकसान

ढगाळ वातावरण गव्हासाठी अनुकूल असले तरी याचा फटका हरभरा, तूर, भाजीपाला या पिकांना बसण्याची शक्यता आहे. या पिकांवर कीड पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे. पाऊस दखलपात्र झाला नसला तरी अशा वातावरणात पाऊस पडल्यास हरभऱ्याचा खार धुतला जाऊन घाटे न भरण्याची शक्यता असते. असे झाल्यास या पिकालाही मोठा फटका बसू शकतो.

Web Title: Rainy feel on a winter day in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.