पावसाची उसंत; धानाला फटका : रोवण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 08:52 PM2020-07-31T20:52:09+5:302020-07-31T20:54:49+5:30

जुलै महिन्यात पावसाचा खंड पडला तर काही भागात तुरळक पाऊस पडला. हा पाऊस धानाच्या पेरणीसाठी पोषक नसल्याने धानाच्या रोवणीला फटका बसला आहे.

Rainy season; Hitting the grain: roaping staggered | पावसाची उसंत; धानाला फटका : रोवण्या रखडल्या

पावसाची उसंत; धानाला फटका : रोवण्या रखडल्या

Next
ठळक मुद्देतूर, कपाशीचा पेरा घटला : जिल्ह्यात ९३ टक्के पेरण्या पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुलै महिन्यात पावसाचा खंड पडला तर काही भागात तुरळक पाऊस पडला. हा पाऊस धानाच्या पेरणीसाठी पोषक नसल्याने धानाच्या रोवणीला फटका बसला आहे. आतापर्यंत नियोजित क्षेत्राच्या ६५ टक्के रोवणी झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ९३ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.
जूनमध्येच मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचा वेग वाढविला. कोरोनाचे संक्रमण असतानाही आजवर शेतकऱ्यांच्या ९३ टक्क्यावर पेरण्या पूर्ण झाल्या. कृषी विभागाकडून यंदा जिल्ह्यासाठी खरीपाचे ५ लाख १०० हेक्टरवर नियोजन केले होते. सद्यस्थितीत आजवर ४ लाख ४१ हजार हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनची १२१ टक्के पेरणी झाली आहे. यंदा सोयाबीनचे नियोजित क्षेत्र ८५ हजार हेक्टर होते. पण पेरणी १०१६२० हेक्टरवर झाली आहे. तुरीचे क्षेत्र यंदा ६५ हजार हेक्टर नियोजित होते. गेल्यावर्षी तुरीची ५१३६३ हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, यंदा त्यात घट होऊन ती ५० हजार ४३९ हेक्टर इतकीच झाली आहे. कपाशीची गेल्यावर्षी बंपर पेरणी म्हणजेच २ लाख ३५ हजार २७५ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा कपाशीचे नियोजित क्षेत्र २ लाख ३५ हजार इतके असतानाही आजवर केवळ २००९३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक, पारशिवनी, कामठी, मौदा, भिवापूर, कुही, उमरेड या तालुक्यात धानाची लागवड होते. पावसाचाच खंड पडल्याने जिल्ह्यात धानाची केवळ ६३ हजार ६२१ हेक्टरवरच रोवणी झाली. यंदा धानाचे नियोजित क्षेत्र ९५ हजार हेक्टर इतके आहे. पऱ्हे तयार आहेत, मात्र पावसामुळे रोवणी रखडली आहे.

पेंचच्या पाण्याचा फायदा
पावसाचा खंड पडल्यामुळे धानाची रोवणी अडचणीत आली आहे. परंतू पेंच प्रकल्पाचे पाणी धान रोवणीसाठी सोडल्यामुळे रामटेक, पारशिवनी, कामठी व मौदा या तालुक्यांना फायदा होणार आहे.
मिलिंद शेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

Web Title: Rainy season; Hitting the grain: roaping staggered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.