नागपूरच्या लाॅजमध्ये मिळाला रायपूरच्या अधिकाऱ्याचा मृतदेह ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:15 AM2021-03-04T04:15:19+5:302021-03-04T04:15:19+5:30
नागपूर : छत्तीसगडच्या रायपूर येथून बेपत्ता असलेले काेषागाराचे सहसंचालक राजेश श्रीवास्तव (५५) यांचा मृतदेह बुधवारी रात्री सीताबर्डी परिसरातील पूजा ...
नागपूर : छत्तीसगडच्या रायपूर येथून बेपत्ता असलेले काेषागाराचे सहसंचालक राजेश श्रीवास्तव (५५) यांचा मृतदेह बुधवारी रात्री सीताबर्डी परिसरातील पूजा लाॅज येथे मिळाला. उल्लेखनीय म्हणजे राजेश श्रीवास्तव गेल्या १ मार्चपासून बेपत्ता हाेते. ते मूळचे बिलासपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश श्रीवास्तव यांनी मंगळवारी सकाळी १० वाजता खाेली बुक केली हाेती. यानंतर बुधवारी सकाळी ९.३० वाजता खाेलीबाहेर फिरायला गेल्याचे सांगण्यात येत आहे. अर्ध्या तासानंतर लाॅजमध्ये परतले आणि खाेलीत गेले. त्यानंतर त्यांच्या खाेलीचे द्वार बंद हाेते. सायंकाळी ७ वाजता लाॅज कर्मचाऱ्यांनी त्यांचा दरवाजा ठाेठावला पण आतमधून काहीही प्रतिक्रिया आली नसल्याने दरवाजा ताेडण्यात आला. आत श्रीवास्तव यांचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला. सीताबर्डी पाेलिसांच्या नुसार त्यांच्या खाेलीत सुसाईड नाेट मिळाली नाही. शिवाय काेणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही, ज्यावरून आत्महत्येचे कारण समजू शकेल. खाेलीमध्ये त्यांचे माेबाईल आणि आधार कार्ड मात्र सापडले, ज्यावरून त्यांची ओळख पटली.