ओबीसी साहित्य संमेलनातून मांडणार वंचित महिलांच्या व्यथा : विजया मारोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 08:55 PM2019-12-23T20:55:01+5:302019-12-23T21:03:06+5:30

कवयित्री आणि साहित्यिक म्हणून विजया मारोतकर सर्वपरिचित आहेत. राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पहिल्या ‘ओबीसी महिला साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे.

Raise Disappointment of deprived women in OBC Literary Convention : Vijaya Marotkar | ओबीसी साहित्य संमेलनातून मांडणार वंचित महिलांच्या व्यथा : विजया मारोतकर

ओबीसी साहित्य संमेलनातून मांडणार वंचित महिलांच्या व्यथा : विजया मारोतकर

Next
ठळक मुद्देएक कवयित्री म्हणून पहिलीच संमेलनाध्यक्ष हा बहुमान मोलाचालिहित्या महिलांना मनातले विचार बाहेर काढण्याचे करणार आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कवयित्री आणि साहित्यिक म्हणून विजया मारोतकर सर्वपरिचित आहेत. राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पहिल्या ‘ओबीसी महिलासाहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. या संमेलनातून त्या आपल्या साहित्यविषयक संसाराचा वैचारिक पसारा मांडणार आहेत. विशेषत्त्वाने ओबीसी समाजातील वंचित महिलांच्या व्यथांना समाजाच्या पुढे ठेवण्याचा संकल्प विजया मारोतकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
देशात ओबीसी ही वर्गवारी सर्वात मोठी आहे. राजकीय भाषेत बोलायचे तर बहुसंख्यक आणि प्रचलित भाषेत बहुजन म्हणूया. मात्र, विभिन्न जातींमध्ये विभागलेल्या या वर्गात समन्वय नाही. प्रत्येक जातींच्या वेगळ्या संकल्पना, उच्च-निचतेच्या वेगळ्या धारणा आहेत. अशी भिन्नता असली तरी संस्कृती-परंपरा एकच आहे. ओपन आणि एससी/एसटी या दोन्ही टोकाच्या वर्गांना जोडणारा मध्यम दुवा म्हणजे ओबीसी, अशी समर्पक व्याख्या करता येईल. इतर दोन्ही वर्गाप्रमाणे ओबीसींमधील महिला परंपरेने अनेक गोष्टींपासून वंचितच राहील्या आहेत. त्या व्यथा संमेलनाध्यक्ष म्हणून व्यासपीठावर मांडण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. मुळात महिलाच तुमचा धर्म, तुमची संस्कृती, परंपरा नेटाने जपतात. तुमचे घर सांभाळतात, मुला-बाळांना संस्कार देतात आणि स्वत: मात्र कायम उपेक्षित असतात. उपेक्षेचे हे दडपण कधीच बाहेर येत नाही. या दडपणाला वाचा फोडण्यासाठी हे संमेलन आहे आणि त्या व्यासपीठाचा योग्य उपयोग मी करणार असल्याचे मारोतकर म्हणाल्या. चांगल्या विचारांचा पगडा स्वत:च्या मनावर पडू द्या आणि त्यासाठी सतत वाचत राहा, लिहित राहा असे आवाहन करणार असल्याचे विजया मारोतकर म्हणाल्या.


हे विषय ठेवणार!
ओबीसी महिलांनी मनातले दडपून न ठेवता ते बाहेर काढावे, त्यांचे लिखाण प्रकाशित व्हावे, त्यासाठी सामुदायिक प्रयत्न व्हावे, इतर महिला लेखिकांसोबतच ओबीसी लेखिकांचे वाचन सर्वदूर पोहोचावे, ओबीसी महिला लेखिकांची वेगळी सूची तयार करावी, शासनाने संमेलनाला अनुदान द्यावे, ओबीसी महिला लेखिकांच्या लेखनाला ग्रंथालयात स्थान मिळावे, त्यासाठी स्वतंत्र ग्रंथालये निर्मित व्हावी, प्रकाशन व वितरणाची व्यवस्था व्हावी.. असे ठळक विषय संमेलनातून ठेवणार असल्याचे विजया मारोतकर म्हणाल्या.

एका घटनेने जन्म झाला ‘त्या’ कवितेचा
माझी एक विद्यार्थीनी होती. फुलपाखराप्रमाणे सतत हसत-बागडत राहणारी. १२वीला असताना अचानक ती शांत असायची. एकदा तिला या परिवर्तनासंदर्भात एकट्यात बोलते केले. प्रेमप्रकरणात मिळालेला दगा आणि त्यातून तिच्या घरात निर्माण झालेला वादंग कळला. घरी जाऊन समजावले. आई समजली मात्र सातच दिवसात त्या पोरीने आत्महत्या केली. ती घटना आजही हेलावून सोडते आणि त्यातून ‘पोरी जरा जपून’ ही कविता जन्माला आली आणि आता ती चळवळ म्हणून उभी झाल्याचे विजया मारोतकर म्हणाल्या. ‘कवितेच्या गावात’, ‘बाई’, ‘चिमणा-चिमणी’ हे त्यांचे काव्यमय सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सतत सुरू आहेत. यासोबतच त्यांनी अनेक काव्यसंग्रह, कथासंग्रह, समीक्षाग्रंथ, लेखसंग्रह, चरित्रलेखन, कादंबरी, इतिहास जतन, चरित्रांतून महिलांच्या व्यथा आणि त्यांना मार्गदर्शन करणारे विचार मांडले आहेत.

Web Title: Raise Disappointment of deprived women in OBC Literary Convention : Vijaya Marotkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.