लसीकरणाबाबत युद्धस्तरावर जनजागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:06 AM2021-06-19T04:06:31+5:302021-06-19T04:06:31+5:30

- जनमंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पीक कर्ज, गरजूंना धान्य, सिटीसर्वेची कामे व स्टॅम्पपेपरचा पुरवठा करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क ...

Raise public awareness about vaccination on the battlefield | लसीकरणाबाबत युद्धस्तरावर जनजागृती करा

लसीकरणाबाबत युद्धस्तरावर जनजागृती करा

Next

- जनमंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पीक कर्ज, गरजूंना धान्य, सिटीसर्वेची कामे व स्टॅम्पपेपरचा पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाविरुद्ध लसीकरण अभियान वेग पकडत नाही. अनेकांमध्ये लसीकरणाबाबत बरेच संभ्रम आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणाबाबत जनजागृती अभियान राबविण्याच्या मागणीचे निवेदन जनमंचने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

यासोबतच जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांना त्वरित कर्जवाटपाचा आदेश देणे, अंत्योदय व प्राधान्य गट रेशनकार्डधारकांना नियमित धान्याचा पुरवठा करणे, स्टॅम्पपेपरचा तुटवडा दूर करून त्यातील भ्रष्टाचार दूर करणे आणि सीटी सर्वे कार्यालयातील सॉफ्टवेअर तीन महिन्यापासून बंद असल्याने म्युटेशनची कामे खोळंबली आहेत. म्युटेशनची कामे सुरळीत करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष ॲड. मनोहर रडके, महासचिव विठ्ठल जावळकर, राम आखरे, प्रकाश गौरकर, प्रदीप निनावे, टी.बी. जगताप उपस्थित होते.

..................

Web Title: Raise public awareness about vaccination on the battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.