राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वर्ष करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:03+5:302021-03-15T04:09:03+5:30
इंटकची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्रात राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ...
इंटकची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वर्ष आहे, तर अन्य २५ राज्यांत ६० वर्ष आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार देशातील सरासरी आयुष्य ८ ते १० वर्षांनी वाढले आहे. कार्यक्षमताही वाढली आहे. विचार करता सेवानिवृत्तीचे वयोमर्यादा ६० वर्ष करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश इंटकच्या नागपूर शाखेने केली आहे.
इंटकचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे, संघटन सचिव ईश्वर मेश्राम, कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे आदींनी मुखयमंत्र्यांना या संदर्भात पत्र पाठविले आहे. वेतनावरील खर्च टाळण्यासाठी नवीन कर्मचारी भरती न करता कंत्राटी कर्मचारी ठेवले जात आहे. हा प्रकार अनुचित आहे. तो त्वरित थांबविण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा वाढविल्यास प्रशासनाला अनुभवी कर्मचारी मिळतील. दुसरीकडे आर्थिक बचतही होणार असल्याने या मागणीचा विचार करावा, अशी या पत्रात नमूद केले आहे.