Raj Thackeray: राज ठाकरेंचं मिशन विदर्भ! नागपुरात रेल्वेनं पोहोचले, ढोल-ताशांचा 'आवाज' घुमला; ५ दिवस पक्ष बांधणीवर मंथन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 10:28 AM2022-09-18T10:28:58+5:302022-09-18T10:29:39+5:30

Raj Thackeray In Nagpur: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.

Raj Thackeray Mission Vidarbha reached in Nagpur by train 5 days brainstorming on party building | Raj Thackeray: राज ठाकरेंचं मिशन विदर्भ! नागपुरात रेल्वेनं पोहोचले, ढोल-ताशांचा 'आवाज' घुमला; ५ दिवस पक्ष बांधणीवर मंथन

Raj Thackeray: राज ठाकरेंचं मिशन विदर्भ! नागपुरात रेल्वेनं पोहोचले, ढोल-ताशांचा 'आवाज' घुमला; ५ दिवस पक्ष बांधणीवर मंथन

googlenewsNext

Raj Thackeray In Nagpur: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. मुंबई ते नागपूर असा रेल्वेने प्रवास करत ते सकाळी नागपुरात दाखल झाले. राज ठाकरेंचं नागपूर रेल्वे स्थानकावर यावेळी जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशांच्या गजरात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं. आज ते नागपुरात मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. 

राज ठाकरे १८ पासून विदर्भात; सेनेची जागा घेण्याचे मनसेचे मनसुबे

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे प्रयत्न करत असून २२ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच पाच दिवस ते विदर्भात असणार आहेत. पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांशी बोलून पक्ष बांधणीवर ते लक्ष देणार आहेत. विदर्भातील विविध जिल्ह्यांना स्वत: राज ठाकरे भेट देणार आहेत. तसंच उद्या ते पत्रकार परिषद घेणार आहेत.  

राज ठाकरे यांनी आजवर नागपूर किंवा विदर्भावर विशेष फोकस केला नव्हता. राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये पश्चिम नागपुरात जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते नागपूर मार्गे वणी येथे प्रचारासाठी गेले होते. हे दोन प्रसंग वगळता त्यांनी नागपुरात संघटनात्मक आढावा बैठक घेतलेली नाही. १८ सप्टेंबर रोजी सकाळी नागपुरात आगमन झाल्यावर ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करणार आहेत. रात्री इतर पक्षातील काही प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठीही होणार आहेत.

राज ठाकरेंचा आदेश आला, मनसे नेते लागले कामाला; युतीबाबत अखेर ठरलं!

मनसे स्वबळावर लढणार
मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीचे वारे वाहू लागले होते. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा होत असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. पण या सर्व चर्चांना अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेने पुन्हा एकदा 'एकला चलो रे' चा नारा दिला आहे. मुंबईत मनसे सर्व जागांवर म्हणजेच २२७ जागांवर उमेदवार देणार असल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मुंबईसोबतच इतरही सर्व महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title: Raj Thackeray Mission Vidarbha reached in Nagpur by train 5 days brainstorming on party building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.