राजीव गांधी यांनी देशाला तंत्रज्ञान युगात नेले

By Admin | Published: May 22, 2016 02:51 AM2016-05-22T02:51:12+5:302016-05-22T02:51:12+5:30

देशाला आधुनिकतेकडे नेण्यात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पुढाकाराने देशाने ज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली.

Rajiv Gandhi took the country into the technology era | राजीव गांधी यांनी देशाला तंत्रज्ञान युगात नेले

राजीव गांधी यांनी देशाला तंत्रज्ञान युगात नेले

googlenewsNext

शहर काँग्रेसतर्फे अभिवादन : दहशतवादविरोधात शपथ
नागपूर : देशाला आधुनिकतेकडे नेण्यात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पुढाकाराने देशाने ज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली. देश त्यांचे हे ऋण कधीही विसरणार नाही, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
नागपूर शहर काँग्रेसतर्फे देवडिया काँग्रेस भवनात राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आ. यादवराव देवगडे, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, सुभाष खोडे, घनश्याम मांगे, रिचा जैन आदींनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दशतवादविरोधात लढण्याची शपथ घेतली. यावेळी विजय बाभरे, बंडोपंत टेंभुर्णे, रत्नाकर जयपूरकर, अजय हिवरकर, संदेश सिंगलकर, संजय दुबे, जयंत लुटे, रामकुमार मोटघरे, डॉन थॉमस, प्रा. अनिल शर्मा, राजश्री पन्नासे, प्रेरणा कापसे, सरस्वती सलामे, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, हर्षला साबळे, प्रवीण आगरे, पंकज थोरात, पंकज निगोट, अब्दुल शकील, प्रभाकर खापरे, तनवीर अहमद आदी उपस्थित होते. संचालन सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार यांनी केले.(प्रतिनिधी)

राष्ट्रवादीतर्फे अभिवादन
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वर्धा रोडवरील राजीव गांधी चौकात स्थापन करण्यात आलेल्या राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आ. दीनानाथ पडोळे, दिलीप पनकुले, देवीदास घोडे, महादेवराव फुके, प्रा. एस.के. सिंग, संजय शेवाळे, भाईजी मोहोड, रवींद्र मुल्ला, सोपानराव शिरसाट, बबलू चौहान, मच्छिंद्र आवळे, भीमराव हाडके, विजय मसराम, परसराम खडसे, सूरज बोरकर, वसंत घटाटे, निर्मला कुंभरे, प्रमोद वानकर, लाला नागपुरे, अनिरुद्ध मिश्रा, विष्णू यादव, श्रीकांत हाडके, अरविंद ढेंगरे, मंदार हर्षे आदी उपस्थित होते.

Web Title: Rajiv Gandhi took the country into the technology era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.