राजीव जैन एसीबीचे नवीन एसपी
By admin | Published: May 14, 2015 02:36 AM2015-05-14T02:36:38+5:302015-05-14T02:36:38+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक (एसपी) प्रकाश जाधव यांची खंडाळा पोलीस
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक (एसपी) प्रकाश जाधव यांची खंडाळा पोलीस स्कुल येथे प्राचार्य म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चंद्रपूरचे एसपी राजीव जैन हे एसीबीचे नवीन प्रमुख असतील.
जैन हे भारतीय पोलीस सेवेच्या २००७ च्या बॅचचे अधिकारी आहेत. जाधव यांना एसीबीमध्ये केवळ ९ महिने झाले होते. त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे एसीबीमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचप्रकारे शहर पोलीसचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सी.जी. दैठणकर यांना पाठविण्यात आले आहे. डीसीपी (मुख्यालय) एस.एम. वाघमारे यांना मुंबईत पाठविण्यात आले आहे. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या व पदोन्नती करण्यात आल्या. या अंतर्गत अमरावतीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून एस.एस. सोळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच एस.जी. दिवाण यांची चंद्रपूरचे तर अंकित गोयल यांची वर्ध्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुुक्ती करण्यात आली आहे. सोळुंके हे पुणे येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. तर दिवाण हे नाशिक येथे डीसीपी होते. तसेच गोयल हे कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक होते. तसेच बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक एस.आर. दिघावकर यांची एसआरपीएफ नवी मुंबई येथे, अमरावतीचे पोलीस अधीक्षक व्ही.कहू यांची सोलापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.