राजीव कपूर यांचे होते नागपूरशी ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:24+5:302021-02-10T04:09:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कपूर घराणे आणि नागपूर यांचे विशेष ऋणानुबंध आहेत. एकतर चित्रपट वितरणासाठी राज ...

Rajiv Kapoor had a bond with Nagpur | राजीव कपूर यांचे होते नागपूरशी ऋणानुबंध

राजीव कपूर यांचे होते नागपूरशी ऋणानुबंध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कपूर घराणे आणि नागपूर यांचे विशेष ऋणानुबंध आहेत. एकतर चित्रपट वितरणासाठी राज कपूरपासून ते राजीव कपूर यांच्यापर्यंत नागपूरला येत-जात असत आणि दुसरे म्हणजे, कपूर घराण्यातील मुलीचे नागपूर हे सासर होय. त्याच अनुषंगाने राजीव कपूर यांचे नागपूरला नेहमी येणे-जाणे असे. आज त्यांच्या निधनाने त्या स्मृतींना त्यांची आत्येबहीण अनुराधा खेता यांनी उजाळा दिला.

रितू नंदा, ऋषी कपूर व राजीव कपूर या तिघा भावंडांनी एकाच वर्षाच्या आत अखेरचा श्वास घेतल्याने कपूर घराण्यावर एकापाठोपाठ शोककळा पसरली आहे. राजीव कपूर यांची आत्या ऊर्मिला यांचा विवाह नागपुरातील प्रतिष्ठित सियाल घराण्यातील चरणजितसिंह सियाल यांच्याशी झाला होता. या नातेसंबंधामुळे कपूर घराण्याचे नागपुरात कायम येणे-जाणे असे. ऊर्मिला सियाल यांची मुलगी अनुराधा यांचा विवाह शहरातीलच प्रसिद्ध उद्योगपती खेता घराण्यात प्रकाश खेता यांच्याशी झाला. त्या प्रत्येक सोहळ्यात राजीव कपूर नागपूरला आले आहेत. २०१४ मध्ये ते अनुराधा खेता यांची मुलगी प्रियंकाच्या विवाह सोहळ्यासाठी नागपूरला आले होते. त्यावेळी ते दीर्घकाळ नागपुरात राहिले होते. नागपूरची ती भेट त्यांची अखेरचीच ठरली. राजीव आणि माझ्या वयात फारसे अंतर नसल्याने आमची चांगली बॉण्डिंग होती, असे अनुराधा सांगत होत्या. लहानपणी ते नागपुरात नेहमी येत असत. तेव्हा दंगामस्ती कायमच असे. २०१९ मध्ये त्यांच्याशी माझी शेवटची भेट दिल्लीत कौटुंबिक सोहळ्र्यात झाली होती, असे खेता यांनी सांगितले.

....

फोटो ओळी :- २०१४ मध्ये अनुराधा खेता यांची मुलगी प्रियंकाच्या विवाहसोहळ्यात राजीव कपूर यांनी हजेरी लावली होती, तेव्हाचे छायाचित्र.

Web Title: Rajiv Kapoor had a bond with Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.