राजू शेट्टी देणार एनडीएला सोडचिठ्ठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 01:23 AM2017-08-13T01:23:38+5:302017-08-13T01:23:41+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला सोडचिठ्ठी देण्याची चिन्हे आहेत. शेतकरी कर्जमुक्तीबाबत सरकार असंवेदनशील असल्याने याबाबतचा निर्णय येत्या १५ दिवसांत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल, असे खा. शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला सोडचिठ्ठी देण्याची चिन्हे आहेत. शेतकरी कर्जमुक्तीबाबत सरकार असंवेदनशील असल्याने याबाबतचा निर्णय येत्या १५ दिवसांत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल, असे खा. शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
शेतकºयांना कर्जमुक्ती देण्याच्या अटीवरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्रात एनडीएला समर्थन दिले होते.
मात्र, दिलेल्या आश्वासनाबाबत केंद्र सरकार संवेदनशील दिसत नाही. त्यामुळे आता यापुढे एनडीएशी संबंध ठेवायचे का, याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे खा. शेट्टी म्हणाले.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना संघटनेच्या कार्यकारिणीतून निलंबित करण्यात आले आहे. आता खोत हे मंत्रिपदावर भाजपाकडून आहेत की स्वाभिमानीच्या कोट्यातून याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे.
खोत यांचा विधान परिषदेचा अर्ज भरताना भाजपाने स्वत:चा ए-बी
फॉर्म जोडून तेव्हाच धोका दिला होता. त्यानंतर सदाभाऊंचीही वागणूक बदलली. त्यांनी पुणतांबा
येथील शेतकºयांचे आंदोलन तोडण्याचा प्रयत्न
केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रात मंत्रिपद स्वीकारणार नाही
आपण केंद्रात मंत्री होणार असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत; पण त्यांना आधार नाही. आपण कधीही भाजपा नेत्यांकडे मागणी केलेली नाही. न मागता देईल एवढे भाजपाचे नेतृत्व उदारमतवादी नाही. मात्र, शेतकºयांचे प्रश्न न सोडविल्यामुळे केंद्र सरकारने मंत्रिपदाची आॅफर दिली तरी आपण ती स्वाकीरणार नाही, असेही खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.