राजकीय हस्तक्षेपाला थारा देणार नाही : राकेश ओला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:15 PM2018-08-02T23:15:09+5:302018-08-02T23:17:01+5:30

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुन्हेगार व त्यांना मदत करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शिवाय, तपास कार्यात राजकीय हस्तक्षेपाला थारा दिला जाणार नाही. सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पोलीस विभागाकडून प्रयत्न केले जाईल, अशी माहिती जिल्ह्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

Rakesh Ola will not allow political intervention | राजकीय हस्तक्षेपाला थारा देणार नाही : राकेश ओला

राजकीय हस्तक्षेपाला थारा देणार नाही : राकेश ओला

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हेगारांची गय नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुन्हेगार व त्यांना मदत करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शिवाय, तपास कार्यात राजकीय हस्तक्षेपाला थारा दिला जाणार नाही. सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पोलीस विभागाकडून प्रयत्न केले जाईल, अशी माहिती जिल्ह्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ओला म्हणाले, ग्रामीण पोलिसांचे कार्यक्षेत्र विस्तारित आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या निवारणासाठी पोलीस मुख्यालयात यावे लागते. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पोलीस ठाण्यातच तशी व्यवस्था केली जाईल.
महामार्गालगतच्या फार्म हाऊसमधील हालचाली, हुक्का पार्लर या संदर्भात बोलताना ते म्हणाले, या संदर्भात सूचना मिळाल्यास वेळीच योग्य कारवाई केली जाईल. कुख्यात गुन्हेगारांच्या विरोधात मोकाअंतर्गत कारवाई केली जाईल. अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घातला जाईल. पर्यटनस्थळ, नदी, तलावातील दुर्घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जाईल, क्षुब्ध जमावाद्वारे खून करण्याच्या घटनांना (मॉब निंचिंग) आळा घातला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रेती - कोळसा तस्करांवर नजर
रेती आणि कोळशाच्या तस्करीमुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यामुळे ही तस्करी करणाºयांसोबत या अवैध व्यवसायात असलेल्या व्यक्तींच्या हालचालींवर नजर ठेवली जाईल. यात पोलीस विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचीही गय केली जाणार नाही. खापरखेडा व कन्हान ठाण्यांतर्गत अवैध शस्त्र विक्री केली जाते. या विक्रीचे मध्य प्रदेशशी कनेक्शन आहे. त्यामुळे यातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दारू व गुरांच्या अवैध वाहतुकीला आळा
वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, या दोन्ही जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारू पोहोचविली जाते. शिवाय, गुरांची अवैध वाहतूक डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे दारू व गुरांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जाईल. त्यासाठी प्रसंगी वर्धा व चंद्रपूर जिल्हा पोलिसांची मदत घेतली जाईल, असेही पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्पष्ट केले.

Web Title: Rakesh Ola will not allow political intervention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.