किन्नरांकडून बांधल्या राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:05+5:302021-08-27T04:13:05+5:30
नागपूर : डॉ. मुंजे सभागृहात बुधवारी रक्षाबंधनाचा आगळवेगळा उपक्रम पार पडला. समाजातील एक घटक असलेल्या तृतीयपंथीयांबरोबर रक्षाबंधन करून समाजाला ...
नागपूर : डॉ. मुंजे सभागृहात बुधवारी रक्षाबंधनाचा आगळवेगळा उपक्रम पार पडला. समाजातील एक घटक असलेल्या तृतीयपंथीयांबरोबर रक्षाबंधन करून समाजाला नवा संदेश दिला. मिशन विश्वास आणि किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम झाला.
श्रद्धा जोशी, डॉ. जयश्री बारई आणि पद्मश्री सारडा यांनी मागील वर्षीपासून हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. तृतीययपंथीसुद्धा समाजाचा भाग आहे. त्यांना योग्य सन्मान मिळावा, यासाठी या उपक्रमाचे यंदाही आयोजन करण्यात आले. किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष राणी ढवळे, उपाध्यक्ष पूजा वर्मा, सचिव राशी कोचे तसेच खुशबू, शिवन्या, रोशनी, पिंकी, शिल्पा आदी किन्नर यावेळी उपस्थित होते. मिशन विश्वासचे महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, प्रचारक क्षितिज गुप्ता, भाग कार्यवाह गौरव जाजू, भाजप वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. गिरीश चरडे, मिलिंद भाकरे, केवल मदनकर, डॉ. प्रणाम सदावर्ते, अनिरुद्ध जोशी, प्रशांत उत्तलवार आदी यावेळी उपस्थित होते.