मुंडले सभागृहात सैनिकांचे रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:11 AM2021-08-23T04:11:40+5:302021-08-23T04:11:40+5:30
नागपूर : माजी वायूसैनिक कल्याण संघटना आणि एअर फोर्स असोसिएशन नागपूर चॅप्टर यांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थिनींनी सैनिकांना राख्या बांधल्या. ...
नागपूर : माजी वायूसैनिक कल्याण संघटना आणि एअर फोर्स असोसिएशन नागपूर चॅप्टर यांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थिनींनी सैनिकांना राख्या बांधल्या. मुंडले सभागृह हा कार्यक्रम रविवारी पार पडला.यावेळी मेजर जनरल अच्यूत देव म्हणाले, भारतीय जनता देशावर आणि सैनिकांवर प्रेम करते, संकट येते तेव्हा सैनिकांच्या पाठीशी उभी राहते. म्हणूनच सीमेवर लढतानाही आमचे मनोबल कधीच खचत नाही.
वायूसेना अनुरक्षण कमांड स्वाड्रन लिडर विनितकुमार नायर यांनी देशसेवेसाठी सैन्यात कसे जावे यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन विविध उदाहरणे सांगितली.
सामाजिक कार्यकर्त्या साधना हिंग्वे यांनी मनोगतातून या उपक्रमाचे कौतूक केले. या कार्यक्रमाला एनसीसी कॅडेटॅस, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. ग्रृप कॅप्टन मार्डीकर, इवानचे सल्लागार ब्रिगेडियन सुनिल गावपांडे यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.