५० वर्षानंतरही अयोध्येतील राम मंदिर पाडले जाऊ शकते, तोगडियांनी सांगितलं 'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 11:24 AM2023-02-06T11:24:43+5:302023-02-06T11:45:36+5:30

देशात जनसंख्येच्या असमतोलाचा अभाव आहे. हा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे, असे मत तोगडिया यांनी व्यक्त केले

Ram temple in Ayodhya may be demolished even after 50 years, fears Pravin Togadia | ५० वर्षानंतरही अयोध्येतील राम मंदिर पाडले जाऊ शकते, तोगडियांनी सांगितलं 'कारण'

५० वर्षानंतरही अयोध्येतील राम मंदिर पाडले जाऊ शकते, तोगडियांनी सांगितलं 'कारण'

googlenewsNext

नागपूर - विश्व हिंदू परिषदेमधून बाहेर पडल्यानंतर प्रविण तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदचेची स्थापन केली. त्या माध्यमातून ते आपले कार्य पुढे नेत आहेत. आज प्रवीण तोगडिया विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात पत्रकार परिषद घेत तोगडिया म्हणाले की, अयोध्येत बांधले जाणारे राम मंदिर ५० वर्षांनंतरही पाडले जाऊ शकते. याचे कारण म्हणजे देशाची असतुंलन असलेली लोकसंख्या होय. 

देशात जनसंख्येच्या असमतोलाचा अभाव आहे. हा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे, असे मत तोगडिया यांनी व्यक्त केले. सध्या देशात भाजपचे बहुमताचे सरकार आहे आणि अद्यापही लोकसभा निवडणुकांना एक वर्ष बाकी आहे. या एका वर्षात केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणावा. तसेच, काशी व मथुरा मंदिर बनवण्याचा कायदा देखील सरकारने केला पाहिजे. अॅन्टी लव जिहाद हा कायदा बनला पाहिजे, अशी या सरकारला आपली विनंती असल्याचेही प्रविण तोगडिया यांनी म्हटले. ज्या देशात धर्मासाठी काम करणारे लोक सन्मानित होत नाहीत त्या देशाचे कधीच कल्याण होत नाही. जनसंख्येचे असंतुलन रोखले नाही तर, ५० वर्षानंतर ही बनवलेल्या राम मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो. 

फडणवीसांच्या घरी जाऊन कायदा बनवा

महाराष्ट्रातील लव्ह जिहाद आणि धर्मांतरणच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांत आंदोलन व मोर्चे निघाले आहेत. हिंदूंच्या या आंदोलनावर बोलताना तोगडिया यांनी सरकारला लक्ष्य केलं. सरकार नाही आणि आंदोलन झाले तर समजू शकतो. पण, सत्तेत असून आंदोलन करतात ही हास्यास्पद बाब आहे. महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन कायदा होऊ शकतो. उपमुख्यमंत्री यांच्या घरी बसुन कायदा बनवा आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, असे म्हणत तोगडिया यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. 

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या

राम मंदिरासाठी कारसेवकांचे नेतृत्व करणारे अशोक सिंघल, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, गोरख पीठाधीश्वर महंत अवैद्यनाथ, अयोध्येतील रामचंद्र परमहंस, कोठारी बंधू या सर्वांना भारताने केंद्र सरकाने भारत रत्न देऊन सन्मानित करायला हवे, अशी मागणी तोगडिया यांनी केली.
 

Web Title: Ram temple in Ayodhya may be demolished even after 50 years, fears Pravin Togadia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.