रमाईच्या त्यागाला विश्वात तोड नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:43 PM2019-02-07T23:43:14+5:302019-02-07T23:44:23+5:30
रमाई आंबेडकर यांची खंबीर साथ मिळाल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण पूर्ण करता आले, आपल्या समाजासाठी काम करता आले. रमाईच्या त्यागाला विश्वात तोड नाही. स्वत: बाबासाहेबांनीही रमाईचा त्याग खुल्या मनाने मान्य केला होता, असे प्रतिपादन रमाई आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त उपस्थित मान्यवरांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रमाई आंबेडकर यांची खंबीर साथ मिळाल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण पूर्ण करता आले, आपल्या समाजासाठी काम करता आले. रमाईच्या त्यागाला विश्वात तोड नाही. स्वत: बाबासाहेबांनीही रमाईचा त्याग खुल्या मनाने मान्य केला होता, असे प्रतिपादन रमाई आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त उपस्थित मान्यवरांनी केले.
रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेच्यावतीने गुरुवारी दादासाहेब कुंभारे सभागृह दीक्षाभूमी येथे रमाई आंबेडकर जयंती महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार अनिल वासनिक यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजकुमार वंजारी हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी समता सैनिक दलाचे मार्गदर्शक भदंत नाग दीपांकर, गौतम मोरे, प्रमोद मोरे, महेंद्र मडामे, आशाताई मडामे, यादव मेश्राम, शरद मेश्राम, कुवर रामटेके, नवल राजेंद्र कापसे, अतुलकुमार शरारा प्रमुख अतिथी होते.
यावेळी स्त्रीभूषण रमाई या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रेरणा चिवंडे, प्राची वाहाणे, पल्लवी जीवनतारे, स्नेहा डेकाटे, शालिनी पाटील, प्रा. प्रणाली पाटील, सुलोचना बोरकर, कृष्णाजी बोरकर आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दिलीप तांदळे, मधुकर गजभिये, कमलेश वासनिक, सतीश ढोरे, वंदना निकोसे, अंजना मेश्राम, निशा वंजारी, प्रियंका देशपांडे, प्रगती पारसी प्रामुख्याने उपस्थित होते.
दीक्षाभूमीवर रमाईचा पुतळा उभारा
यावेळी स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेतर्फे दीक्षाभूमी परिसरात रमाई आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या मागणीच्या निवेदनाचे सामूहिक वाचन करण्यात आले. पुतळा संस्थेतर्फे तयार करून दिला जाईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.