रामचित्रायण; चैतन्यची अशीही रामभक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:28 PM2020-04-03T17:28:39+5:302020-04-03T17:29:15+5:30
बालपणीच्या उत्तम संस्कारापायी कोणी उत्तम गायक बनतो, कुणी शिक्षणात तरबेच ठरतो, कुणी समाजसेवक बनतो तर कुणी वैज्ञानिक बनतो. बजाजनगरात राहणारा चैतन्य हा रामभक्त आहे. कोरोनाच्या दुष्प्रभावाखाली जात असलेल्या या काळात गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान त्याने दररोज रामाचे स्केचेस तयार केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चांगले नी वाईट ही जाणिव माणसाला प्रगल्भ बनवित जाते. या जाणिवेचे उन्नयन बालपणातील संस्कारातूनच होत असते. पौराणिक इतिहासातील हिरण्यकश्यपू हा तसा राक्षसवृत्तीचा आणि स्वत:ला जगज्जेता म्हणवून घेण्याच्या दुष्प्रवृत्तीपायी तो तपश्चर्या करतो. त्याचवेळी गर्भवती असलेली त्याची पत्नी कयाधू नारदाच्या आश्रमात भगवतभक्तीमध्ये लिन झालेली असते. गर्भावस्थेतील सत्सचरित्राचा प्रभाव म्हणून कयाधू व हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद विष्णूभक्त होतो. एकीकडे बाप दुराचारी आणि दुसरीकडे पुत्र सदाचारी होतो. बालपणीच्या उत्तम संस्कारापायी असे अनेक प्रल्हाद बघायला मिळतात. कोणी उत्तम गायक बनतो, कुणी शिक्षणात तरबेच ठरतो, कुणी समाजसेवक बनतो तर कुणी वैज्ञानिक बनतो. बजाजनगरात राहणारा चैतन्य हा रामभक्त आहे. कोरोनाच्या दुष्प्रभावाखाली जात असलेल्या या काळात गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान त्याने दररोज रामाचे स्केचेस तयार केले आहेत. ते अतिशय देखणे आहेत.
१२वीला असलेला चैतन्य माटेगावकर बजाजनगरात राहतो. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा, ट्युशन क्लासेस सर्वच बंद आहेत. स्वत:ला सगळ्यांनीच घरात दडवून ठेवले आहे. त्यात घरातून मिळालेला गायनाचा वारसा जपत अभ्यास करणे आणि पुस्तकांचे वाचन करणे हा त्याचा नित्यक्रम. घरातच गायक, अभिनेता, लेखक मंडळी आहेत. आई, वडील, काका, काकू, बहिण सगळेच कलेच्या प्रांतात उच्चस्थान ठेवतात. सोबतच रामभक्तीचे वातावरणही या सगळ्या कलावंतांना पोषकत्त्व प्रदान करते. याच काळात रामनवरात्राच्या नऊ दिवसात त्याच्या मनात वेगळीच कल्पना शिरली. नऊ दिवसात पुजापाती, अभ्यासोबतच रामचरित्राचे स्केचेस काढण्याचा विचार त्याच्या मनात डोकावला आणि गुढीपाडव्यापासून त्याने सुरुवात केली. वाढत्या दिवसानंतर चित्रांची एका दिवसाची संख्याही वाढवत जावी. जसे पहिल्या दिवसी एक, दुसऱ्या दिवशी दोन, तिसºया दिवशी तिन.... नवव्या दिवशी नऊ चित्र काढायचे आणि रामचित्रायणाची मालिका स्वत:च्या कल्पनेनुसार साकारायचे कलात्मक कार्य चैतन्यने केले. असे चाळीसच्या वर चित्रमालिका त्याने या नऊ दिवसात साकारल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने हे चित्र दुसरे चित्र बघून नव्हे तर मनाला भावेल तसे काढली आहेत. त्यातही पेन्सीलचा वापर त्याने टाळला आहे. मार्करने ठरावित वेळेत तसे चित्र साकारायचे. कुठलीही खोडतोड नाही ती मिटवायचे कारण नाही. सलग चित्रमालिका साकारण्याचा उपक्रम नऊ दिवस चालला आहे. यासोबतच चित्र काढून झाले की रामाचे पुजन, रामरक्षा, विष्णूसहस्त्रनाम पठणाची दिनचर्या त्याच्याकडून नित्यनेमाने होत होती.
रामायणावरील रामचित्रमालिका साकारणार! - चैतन्य माटेगावकर
: ही चित्रमालिका साकारली ती केवळ रामावरील श्रद्धेपोटी. असे कार्य होईल, याचा विचारही नव्हता. पुढे रामायणावरील चित्रमालिका साकारण्याची तयारी करणार आहे. मी सध्या बारावीला आहे. त्यानंतर डिझायनिंगमध्येच करिअर करायचे असल्याचे चैतन्य माटेगावकरने सांगितले.
...........