‘सोशल मीडिया’वर राममंदिराचा ‘हुंकार’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:18 AM2018-11-15T01:18:22+5:302018-11-15T01:19:57+5:30

अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरु तसेच नागपुरात हुंकार सभेच्या माध्यमातून शंखनाद करण्यात येणार आहे. या सभेसाठी संघ परिवारातील संघटनांनी कंबर कसली ‘सोशल मीडिया’वर याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपालादेखील विशेष ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. या सभेला कमीत कमी एक लाख लोक यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात विदर्भातील सर्व आमदारांची बैठक १७ नोव्हेंबर रोजी रेशीमबाग स्थित हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात होणार आहे.

Rammadir's 'Hunker' on 'Social Media' | ‘सोशल मीडिया’वर राममंदिराचा ‘हुंकार’ सुरू

‘सोशल मीडिया’वर राममंदिराचा ‘हुंकार’ सुरू

googlenewsNext
ठळक मुद्दे२५ तारखेच्या सभेची तयारी जोरात : संघाने भाजपाला दिले ‘टार्गेट’

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरु तसेच नागपुरात हुंकार सभेच्या माध्यमातून शंखनाद करण्यात येणार आहे. या सभेसाठी संघ परिवारातील संघटनांनी कंबर कसली ‘सोशल मीडिया’वर याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपालादेखील विशेष ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. या सभेला कमीत कमी एक लाख लोक यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात विदर्भातील सर्व आमदारांची बैठक १७ नोव्हेंबर रोजी रेशीमबाग स्थित हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात होणार आहे.
राममंदिरासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी अयोध्या, बंगळुरु व नागपुरात हुंकार सभा होणार आहेत. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने येथून देशात संदेश जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. सुमारे ३०० प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. यात हुंकार सभेबाबत माहिती देण्यात आली. २५ नोव्हेंबर रोजी हनुमान नगर येथील क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ही सभा होणार आहे.
यासंदर्भात सर्व संघटना आपापल्या पातळीवर कामाला लागल्या आहेत. संघभूमीत होणाऱ्या सभेसाठी नागपूरसह सहा लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ते येणार आहेत. विशेष म्हणजे भाजप आमदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधीदेखील सहभागी होणार आहेत. यासंदर्भात संयोजन समितीदेखील तयार करण्यात आली आहे. दररोज विविध पातळ्यांवर बैठका सुरू आहेत व तयारीचा आढावा घेण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘सोशल मीडिया’वर वातावरणनिर्मिती
दरम्यान, हुंकार सभेबाबत संघ परिवारातील विविध संघटनांतून ‘सोशल मीडिया’वर वातावरणनिर्मिती सुरू आहे. शहर व प्रांतातील विविध कार्यकर्त्यांपर्यंत या माध्यमातून माहिती पोहोचविण्यात येत आहे. सोबतच जनमानसातदेखील याबाबत ‘पोस्ट’ पाठविण्यात येत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

१७ तारखेपासून ‘जागरण सत्र’
दरम्यान, जनसामान्यांमध्ये हुंकार सभेबाबत जागृती व्हावी यासाठी विहिंप व विविध संघटनांतर्फे १७ नोव्हेंबरपासून जागरण सत्र राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरातील विविध मंदिरांमध्ये घंटानाद करण्यात येईल. सोबतच भाजयुमोतर्फे राजाबाक्षा मंदिरात सायंकाळी ६ वाजता तर विहिंपतर्फे पोद्दारेश्वर राममंदिरात त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता महाआरती करण्यात येईल. तसेच पत्रकांचेदेखील वाटप होईल.

Web Title: Rammadir's 'Hunker' on 'Social Media'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.