रामनवमीचा उपराजधानीत चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:38 AM2018-03-25T00:38:07+5:302018-03-25T00:38:18+5:30

रामनवमीचे औचित्य साधून पोलिसांचा शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या संवेदनशील वस्त्या आणि विशिष्ट झोपडपट्ट्यानुसार पोलिसांचे संख्याबळ बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.

Ramnavmi's Super police bandobast | रामनवमीचा उपराजधानीत चोख बंदोबस्त

रामनवमीचा उपराजधानीत चोख बंदोबस्त

Next
ठळक मुद्देशहरातील पोलीस ठाणेनिहाय संख्याबळ : एसआरपी, क्यूआरटीसह मोठ्या संख्येत सशस्त्र पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामनवमीचे औचित्य साधून पोलिसांचा शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या संवेदनशील वस्त्या आणि विशिष्ट झोपडपट्ट्यानुसार पोलिसांचे संख्याबळ बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.
रामनवमीचा उत्सव उपराजधानीचे आगळे वैशिष्ट्य आहे. सर्वधर्मसमभावाचे आदर्श उदाहरण ठरणारी, पोद्दारेश्वर राममंदिरातून निघणारी वैभवी शोभायात्रा तर लाखो भाविकांच्या श्रद्धा आणि आकर्षणाचा विषय असते. शोभायात्रेत सहभागी होणारी मंडळी आणि आकर्षक देखावे डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. शोभायात्रेच्या स्वागतासाठी शहरभर कमानी उभारल्या जातात. नेत्रदीपक सजावट, लाईटिंग केले जाते. रस्त्यारस्त्यावर या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी सर्वधर्मांची मंडळी पुढे येत असतात. शोभायात्रेत सहभागी झालेल्यांना अनेकांकडून अल्पोपहार, चहा, ज्यूस, सरबत वितरित केले जाते. शोभायात्रेत तोबा गर्दी असते. त्यामुळे समाजकंटकांनी काही अनुचित प्रकार करू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. शोभायात्रेच्या मार्गावर सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ८०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय परिमंडळ निहाय पोलिसांचा बंदोबस्त वेगळा राहणार आहे.
अधिकाºयांच्या माहितीनुसार परिमंडळ १ मध्ये ३२ पोलीस अधिकारी, १८३ पुरुष आणि ३८ महिला कर्मचारी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळतील. परिमंडळ २ अंतर्गत ३६ अधिकारी, १८३ पुरुष आणि ४० महिला कर्मचारी तैनात राहतील. परिमंडळ ३ मध्ये पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात २ सहायक आयुक्त, ९ पोलीस निरीक्षक, २७ पीएसआय, एपीआय आणि २२९ पुरुष तसेच २७ महिला कर्मचारी जबाबदारी सांभाळणार आहेत.
---
आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज
ऐनवेळी काही स्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी पोलिसांनी राज्य राखीव दलाचे दोन प्लाटून, क्यूआरटीची चार पथके, आरसीबी सज्ज राहणार आहेत. मोठ्या संख्येत सशस्त्र पोलीसही ताफाही राहणार आहे. रामनवमीचा उत्सव याहीवर्षी उत्साहात आणि शांततेत पार पडेल, कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Ramnavmi's Super police bandobast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.