नागपुरात सिरियल किलरचा आठ वर्षांपासून हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:52 PM2017-11-18T23:52:55+5:302017-11-19T00:03:33+5:30

लकडगंज पोलिसांनी हत्या प्रकरणात पकडलेला विकृत सिरियल किलर छल्ला ऊर्फ दुर्गेश ध्रुपसिंग चौधरी (वय २८, रा. रेणुकानगर, गंगाबाग, पारडी) हा नागपूरसह विविध गावांमध्ये गेल्या आठ वर्षांपासून अक्षरश: हैदोस घालत होता, अशी थरारक माहिती उघड झाली आहे.

rampage of Serial Killer for eight years in Nagpur | नागपुरात सिरियल किलरचा आठ वर्षांपासून हैदोस

नागपुरात सिरियल किलरचा आठ वर्षांपासून हैदोस

googlenewsNext
ठळक मुद्देचार हत्या, अनेकांच्या हत्येचे प्रयत्न चोऱ्या  - घरफोड्या : ३० पेक्षा जास्त गुन्हे अनेक गुन्हे दाखलच नाहीत


नरेश डोंगरे
आॅनलाईन लोकमत

नागपूर : लकडगंज पोलिसांनी हत्या प्रकरणात पकडलेला विकृत सिरियल किलर छल्ला ऊर्फ दुर्गेश ध्रुपसिंग चौधरी (वय २८, रा. रेणुकानगर, गंगाबाग, पारडी) याने नागपूरसह विविध गावांमध्ये गेल्या आठ वर्षांपासून अक्षरश: हैदोस घालत होता, अशी थरारक माहिती उघड झाली आहे. त्याने गेल्या सहा महिन्यात तीन तर २००९ मध्ये एक अशा चार हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अनेकांच्या हत्येचा प्रयत्न केला असून, अनेकांवर अत्याचारही केले आहे. चोऱ्या , घरफोड्या, दरोड्यासारखे त्याच्यावर ३० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत तर, अनेक गुन्हे त्याने केले असले तरी त्याची पोलिसांत नोंदच नाही.
टीव्हीवरील एखाद्या हिंसक मालिकेतील (सिरियल) थरारपटासारखाच थरारक घटनाक्रम खतरनाक छल्ला चौधरीच्या गुन्हेगारीचा आहे. वयाच्या बाराव्या वर्षी (२०१३ मध्ये) छल्लाने पहिला गुन्हा केला होता. त्यावेळी पोलिसांकडून फारशी कडक कारवाई झाली नाही. त्यामुळे छल्लातील गुन्हेगार निर्ढावत गेला. तो नुसता निर्ढावलाच नाही तर त्याच्यातील क्रूरता अन् विकृतीही वाढत गेली. छल्ला आधी लहानसहान चोºया करायचा. त्यानंतर नंदनवनमधील सत्यपाल आणि कैलास नागपुरे या दोन भावांची त्याला साथ मिळाली. ते चोºया, घरफोड्या, लुटमार करू लागले. त्यांनी दरोडेही घातले. अनेक सराईत गुंडांसोबत सलगी वाढल्यानंतर २००९ मध्ये छल्लाने पप्या देशभ्रतारच्या मदतीने वेलतूर(कुही)मध्ये एकाची हत्या केली. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर छल्ला पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला. त्याने लुटमार, दरोडे सुरू केले. दोन वर्षांपूर्वी त्याचा साथीदार सत्यपाल नागपुरेची भंडाºयात हत्या झाली. मात्र, छल्लाच्या गुन्हेगारी वृत्तीवर त्याचा परिणाम झाला नाही. त्याचा गुन्हेगारी अभिलेख लक्षात घेता २०१५ मध्ये पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएची कारवाई केली. त्यानंतर काही दिवस त्याला येरवडाच्या कारागृहातही डांबण्यात आले. तेथून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात परतल्यानंतर छल्ला अधिकच क्रूर झाला.
गुन्हेगारीच्या भाषेत येथील मध्यवर्ती कारागृहात त्याच्या नावाचा छल्ला (सिक्का) चालत होता. दरम्यान, जुन्या गुन्ह्यातील मालाच्या हिस्सेवाटणीवरून आणि टोळीच्या वर्चस्वातून छल्लाचा साथीदार आणि मृत सत्यपाल याचा भाऊ कैलास नागपुरेसोबत वाद झाला. त्यानंतर तो यावर्षीच्या जानेवारी महिन्यात कारागृहातून बाहेर आला. पुन्हा एका दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला कारागृहात डांबले. तेथून मार्चमध्ये बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी सुरू केली. यावेळी तो कैलास नागपुरेचा काटा काढण्याच्या तयारीला लागला. एप्रिलच्या दुसऱ्या  आठवड्यातील एका सायंकाळी त्याने नागपुरेला रनाळा शिवारात दारू पिण्याच्या बहाण्याने नेले. तेथे दारूचे पेग रिचविल्यानंतर ध्यानीमनी नसताना छल्लाने बाजूचा दगड उचलून नागपुरेच्या डोक्यात हाणला. त्यानंतर त्याला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. तो अर्धमेला अवस्थेत असताना त्याला फरफटत बाजूच्या रेल्वेलाईनवर नेले. तेथे त्याच्या शरीरावरून रेल्वेगाडी जाईपर्यंत छल्ला बाजूला लपून बसला.

घात करून अपघाताचा बनाव
नागपुरेच्या हत्येला त्यावेळी कामठी पोलिसांनी रेल्वे अपघात मानून प्रकरणाची फारशी चौकशी केली नाही. मात्र, पोलिसांच्या कार्यपद्धती चांगल्याप्रकारे ध्यानात आलेला खतरनाक छल्ला एका आठवड्यानंतर पुन्हा त्याच घटनास्थळ परिसरात (रनाळा शिवार) गेला. तिकडे पोलीस आले असेल काय, हे त्याला बघायचे होते. दिवसभर पोलिसांचा माग काढल्यानंतर त्याने परत बाजूला दारू पिणे सुरू केले. त्याचवेळी तेथे आरिफ अन्सारी हा युवक आला. तो कचरा (पन्नी) वेचत होता. त्याला बघून छल्लाची विकृती जागी झाली. त्याने त्याला खाली पाडून त्याच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. आरिफने जोरदार प्रतिकार केल्यामुळे बाजूचा दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. तो ठार झाल्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वेलाईनवर टाकून छल्ला पसार झाला. इकडे रेल्वेने आरिफचा मृतदेह छिन्नविच्छिन्न केला. घात करून अपघाताचा बनाव करणाºया छल्लाची पोल शवविच्छेदन अहवालात खुलली. आरिफची हत्या झाल्याचे डॉक्टरांनी नोंदवल्यामुळे कळमना पोलिसांनी त्यावेळी हत्येचा गुन्हा दाखल केला. परंतु छल्लाची गचांडी धरण्याचे कौशल्य पोलिसांना दाखवता आले नाही.

अनेक गुन्ह्यांची तक्रारच नाही
या हत्येनंतर परत छल्लाने निगरगट्टपणे त्याच भागात चोरी-घरफोडी, लुटमारीसह गंभीर गुन्हे सुरू केले. अनेक गंभीर गुन्ह्यांची विविध कारणांमुळे पोलिसांकडे नोंदच नाही, अशीही धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे. क्रूरपणे हत्या करणाऱ्या  छल्लाला दुसरी एक विकृती आहे. तो दारूच्या नशेत सैतान बनतो. युवकांवर लैंगिक अत्याचार करीत होता. एप्रिल ते आॅक्टोबर दरम्यान त्याने अनेक मुले, युवकांवर अत्याचार केला आहे. बदनामी आणि दहशतीमुळे अनेकांनी त्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली नाही. त्याला अटक केल्यानंतर कळमना मार्केटमधील दोन पीडितांनी त्यांच्यावर छल्लाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे लकडगंज पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे आता ते दोन गुन्हे पुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: rampage of Serial Killer for eight years in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा