Ramtek Election Results : रामटेकच्या गडावर भाजपचे पानिपत, जयस्वाल यांची बंडखोरी युतीला भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:20 PM2019-10-24T23:20:43+5:302019-10-24T23:21:59+5:30

Ramtek Election Results 2019 : Mallikarjun Reddi Vs Ashish Jaiswal Vs Udaysingh Yadav, Maharashtra Assembly Election 2019

 Ramtek Election Results: Mallikarjun Reddi Vs Ashish Jaiswal Vs Udaysingh Yadav | Ramtek Election Results : रामटेकच्या गडावर भाजपचे पानिपत, जयस्वाल यांची बंडखोरी युतीला भोवली

Ramtek Election Results : रामटेकच्या गडावर भाजपचे पानिपत, जयस्वाल यांची बंडखोरी युतीला भोवली

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस, बसपालाही लागली धाप

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर (रामटेक) : अवघ्या विदर्भाचे लक्ष लागलेल्या रामटेक मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी भाजपचे पानिपत केले. रामटेकचा गड सर करताना काँग्रेस आणि बसपाला धाप लागली. पोलपंडितांचे अंदाज चुकवीत अपक्ष उमेदवार अ‍ॅड. आशिष जयस्वाल २४ हजार ४१३ मतांनी विजयी झाले. जयस्वाल यांना ६७,४१९ तर भाजपचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांना ४३ हजार ०६ मते मिळाली. येथे काँग्रेसचे उदयसिंग यादव तिसऱ्या क्रमांकावर घसरले. यादव यांना ३२ हजार ४९७ मतावर समाधान मानावे लागले.
बसपाचे संजय सत्येकार यांनी ९,४६४ मते आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे रमेश कारामोरे यांनी २४,७३५ मते घेत काँग्रेस आणि भाजपच्या मतांना खिंडार पाडले. यामुळे रामटेकचा गड सर करताना पहिल्या फेरीपासून जयस्वाल यांना अडचण गेली नाही.
२०१४ च्या निवडणुकीत आशिष जयस्वाल यांना भाजपचे रेड्डी यांच्याकडून मात खावी लागली होती. त्यावेळी जयस्वाल यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. यावेळी योग्य नियोजन, कार्यकर्त्यांची उत्तम फळी आणि मतदारांमध्ये असलेल्या विश्वासाच्या बळावर त्यांनी विजयश्री खेचून आणली.
भाजपचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी यावेळी विकासाच्या नावावर मते मागितली असली तरी मतदारांनी त्यांना नाकारले. प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात काँग्र्रेस मुसंडी मारेल, असे मतदार संघात चित्र होते. प्रहार जनशक्ती पार्टीचे रमेश कारामोरे यांनी चांगली हवा तयार केली होती. त्यामुळे या मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत झाली. युतीत रामटेकची जागा शिवसेनेच्या वाट्यात यावी, यासाठी जयस्वाल अखेरपर्यंत आग्रही होते. शेवटी युतीत ही जागा भाजपाच्या कोट्यात गेली. यानंतर जयस्वाल यांनी बंडखोरी करीत गडावर बंडाचा झेंडा रोवला. जयस्वाल यांना पाडण्याचे आदेश मातोश्रीवरून शिवसैनिकांना धडकले. मात्र सच्चा शिवसैनिक अखेरपर्यंत जयस्वाल यांच्यासाठी रामटेकची खिंड लढवीत राहिला आणि विजय निश्चित केला.

शिवसेनेने उमेदवारी नाकारली असली तरी जनतेने उमेदवारी दिल्याने निवडणूक रिंगणात उतरलो. सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी माझ्या विजयासाठी मदत केली. या मतदारसंघातील तरुणांना रोजगार देणे, पांदण रस्त्यांची दुरुस्ती करणे ही कामे अग्रक्रमाने करणार आहे. शिवाय, आपण भाजप- शिवसेना युतीसोबतच राहणार आहे.
 आशिष जयस्वाल, विजयी उमेदवार, रामटेक

Web Title:  Ramtek Election Results: Mallikarjun Reddi Vs Ashish Jaiswal Vs Udaysingh Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.