रामटेक लोकसभा निवडणूक निकाल २०१९; आघाडीच्या उमेदवारांत पहिल्या फेरीपासूनच चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 09:13 AM2019-05-23T09:13:17+5:302019-05-23T09:14:08+5:30
Ramtek Lok Sabha Election Results 2019; रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काटोल विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना पहिल्या फेरीत २०७१ मते असून काँग्रेसच्या किशोर गजभिये यांना १२४३ मते मिळाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काटोल विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना पहिल्या फेरीत २०७१ मते असून काँग्रेसच्या किशोर गजभिये यांना १२४३ मते मिळाली आहेत. तर सावनेर, रामटेक विधानसभा क्षेत्रात किशोर गजभिये आघाडीवर आहेत. रामटेक मतदार संघात मतदारांची एकूण संख्या १८,९७,६०० एवढी आहे. त्यात पुरुष मतदार ९,८५,५३९ तर स्त्रिया मतदार ९,१२,०६१ एवढ्या आहेत. येथे एकूण १६ उमेदवार आपले भाग्य आजमावीत आहेत. रामटेकला झालेल्या मतदानाची टक्केवारी ६२.१२ एवढी आहे. येथे ११ लाख ९३ हजार ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ६ लाख ३९ हजार १२२ पुरुष मतदा
र, तर ५ लाख ५४ हजार १८३ महिला मतदार तसेच २ इतर मतदारांचा समावेश आहे.