२०२४ मध्ये रामटेक लोकसभेचा खासदार भाजपचा : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 09:08 PM2020-01-25T21:08:39+5:302020-01-25T21:37:05+5:30

राज्यामध्ये शिवसेनेने केलेला विश्वासघात, जिल्हा परिषदेत शिवसेनेमुळे झालेला पराभव या पार्श्वभूमीवर भाजपने आता रामटेकचा गड स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Ramtek Lok Sabha MP in 2024 BJP's: Devendra Fadnavis | २०२४ मध्ये रामटेक लोकसभेचा खासदार भाजपचा : देवेंद्र फडणवीस

२०२४ मध्ये रामटेक लोकसभेचा खासदार भाजपचा : देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देभाजपचा शहर व जिल्हा कार्यकर्त्यांचा मेळावा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : राज्यामध्ये शिवसेनेने केलेला विश्वासघात, जिल्हा परिषदेत शिवसेनेमुळे झालेला पराभव या पार्श्वभूमीवर भाजपने आता रामटेकचा गड स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये रामटेक लोक सभेचा खासदार भाजपचा बनेल, असा दावा केला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने गीता मंदिर सभागृहात शहर व जिल्हा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याला केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर, निवडणूक प्रमुख व माजी आमदार अतुल देशकर, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुं भारे, मोहन मते, समीर मेघे, गिरीश व्यास, प्रा. अनिल सोले, माजी आमदार सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, सुधीर पारवे, मल्लिकार्जुन रेड्डी, उपमहापौर मनीषा कोठे, माजी महापौर नंदा जिचकार, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, संदीप जाधव, सुभाष पारधी, रमेश मानकर, उपेंद्र कोठेकर, उकेश चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना सध्याच्या परिस्थितीवर आणि पुढे येणाऱ्या आव्हानावर भाष्य करीत कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविला.

शिवसेनेच्या भगव्याचा रंग फिका पडलाय!  मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात

 कधीकाळच्या आमच्या मित्रपक्षाने आता रंग बदलला आहे. त्याच्या भगव्या रंगावर दुसºया पक्षाचा रंग चढला आहे. त्यामुळे भगव्याचा रंग आता फिका पडला आहे. आमचा रंग बदललेला नाही, असे म्हणणारी शिवसेना राष्ट्रपुरुषांचा अपमान होत असताना चूप का बसत आहे. राष्ट्रहिताच्या विरोधात काम होत असताना ते कुठलाही बाणा दाखवीत नाहीत, राष्ट्रवादाचा विचार त्यांचा बदलला आहे. राज्यात शिवसेनेने सत्ता स्थापन केली आहे, मात्र सत्तेच्या दडपणाखाली शिवसेना वावरत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनीे केली. 

 खोट्या गोष्टी सांगून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न
नागरिकता कायद्याच्या विरोधात देशामध्ये वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.  राष्ट्रीय हिताच्या विषयावर देखील मतांचे राजकारण होऊ लागले आहे. समाजामध्ये देशविरोधी विष कालवून अस्थिरता, अराजकता काही पक्ष निर्माण करीत आहे. या देशात एक कोटी नागरिकांना बांगला देश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून प्रताडीत होऊन आले आहे. त्यांच्यावर अत्याचार झाले आहे. गेल्या ४० वर्षापासून ते लोक भारतात राहत आहे. त्यांना भारताची नागरिकता मिळू शकली नाही. त्यामुळे सरकारने या लोकांना भारतीय नागरिकता देण्यासाठी संशोधन विधेयक तयार करून कायदा केला. याचा अर्थ कुणाची नागरिकता हिसकावण्यात येणार नाही, कुणाला देशाबाहेर काढण्यात येणार नाही. परंतु काही लोक या कायद्याच्या नावारून समाजाला भडकविण्याचे काम करीत आहे,  खोट्या गोष्टी सांगून अराजकता पसरवित आहे.  त्यामुळे या अराजकतेला उत्तर द्यायचे आहे. देशहितासाठी उभे रहायचे आहे, असे आवाहन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले. फडणवीस म्हणाले की, जिल्हा परिषदेत आलेल्या अपयशामुळे जिल्ह्यातील भाजपाची ताकद कमी झाली नाही. कार्यकर्त्यांमुळे पक्षाची पाळेमुळे खालपर्यंत रोवली आहेत. कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता पराभवाचे आत्मचिंतन करून पुन्हा ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीच्या तयारीला लागावे.
दटकेंची फेरनिवड, जिल्हाध्यक्षपदी गजभिये 


मेळाव्यात निवडणूक अधिकारी व माजी आमदार अतुल देशकर यांनी प्रवीण दटके यांची शहर अध्यक्ष व अरविंद गजभिये यांची जिल्हाध्यक्ष म्हणून घोषणा केली. यावेळी बोलताना गजभिये म्हणाले की, भाजपामध्ये कामाची किंमत होते. माझी निवड करून पक्षाने त्याची पावती दिली आहे. पक्षाचे संघटन आणखी मजबूत करून २०२४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही आमदार निवडून आणण्याचा दावा केला. तर प्रवीण दटके यांनी शहरातील सहाही आमदारांसोबत २०२२ मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुकीत १२५ जागा निवडून आणण्याचा निश्चय व्यक्त केला.

आत्मविश्वास जागवून पक्षविस्तार करा : गडकरी 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना गाव, गरीब, मजूर, शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन विकासाकरिता संघर्ष, आंदोलन व संघटनेचा विस्तार करण्याचे आवाहन केले. निवडणुकीत जय-पराजय होत असतात, शहरात आणि जिल्ह्यात आजही भाजपची ताकद कायम आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्यातील आत्मविश्वास जागवून पक्षाचा विस्तार करावा, असे आवाहन केले. विधानसभेच्या निवडणुकीत आपण थोडे मागे आलो. जि.प.मध्ये शिवसेनेच्या भूमिकेमुळे मतांचे विभाजन होऊन १२ जागांचा फटका बसला. यापासून धडा घेऊन पक्ष संघटन पुन्हा मजबूत करीत पराभवाचा वचपा काढण्याचे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले.

Web Title: Ramtek Lok Sabha MP in 2024 BJP's: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.