Ramtek Lok Sabha Results 2024 : रामटेकमध्ये शिंदेसेनेला पहिला धक्का!

By जितेंद्र ढवळे | Published: June 4, 2024 11:41 AM2024-06-04T11:41:30+5:302024-06-04T11:42:20+5:30

Ramtek Lok Sabha Results 2024 : कॉंग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंचे गडावर पहिले पाऊल...

Ramtek Lok Sabha Results 2024 : Congress's Shyamkumar Barve leads in Ramtek | Ramtek Lok Sabha Results 2024 : रामटेकमध्ये शिंदेसेनेला पहिला धक्का!

Congress's Shyamkumar Barve leads in Ramtek

जितेंद्र ढवळे 
रामटेक :
रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत एक्झिट पोलमध्ये आघाडीवर असलेला शिंदेसेनेला धक्का बसला आहे. येथे कॉंग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी 28064 मते घेत शिंदेसेनेचे राजू पारवे यांना 3361 मतांनी मागे टाकले आहे. पारवे यांना 24403 मते मिळाली आहेत. 

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी नागपुरातील कळमना येथील मार्केट यार्डात सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 
18 एप्रिल रोजी रामटेक मतदारसंघात 29 लाख 49 हजार 85 मतदारांपैकी 12 लाख  50  हजार 190 (61.01 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिल्या फेरीत कॉंग्रेसशी बंडखोरी करीत अपक्ष लढणारे किशोर गजभिये यांना 942 मते मिळाली आहेत. याशिवाय ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडलेले वंचितचे शंकर चहांदे यांना 108 मते मिळाली आहे. 

जातवैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर कॉंग्रेसच्या रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला होता. यानंतर झालेल्या राजकीय ‘महाभारता'नंतर रामटेकची निवडणूक राज्यभरात चर्चेत आली होती. 

रामटेकच्या रणागणांत 28 उमेदवार असले तरी मतमोजणीतही कॉंग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि शिंदेसेनेचे राजू पारवे 
यांच्यात थेट टक्कर होताना दिसत आहे. या मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या होतील. त्यामुळे अंतिम निकाल सायंकाळी 6 नंतर येण्याची शक्यता आहे. 
 

येथील ईव्हीएम मोजणीतून बाद
रामटेकअंतर्गत कामठी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळा कामठी येथील मतदान केंद्र क्रमांक 499 येथे मतदानाच्या दिवशी सीयूमधून मॉक पोल डेटा क्लीअर न केल्याचे प्रकरण आहे. त्यामुळे येथील ईव्हीएम मोजणीसाठी घेतली जाणार नाही.


असे झाले मतदान :
विधानसभा - एकूण मतदार- एकूण मतदान - टक्केवारी
काटोल - २,७३,८१४ - १,७२,३९० - ६२.९६
सावनेर - ३,१४,६०५ - १,९३,२६९ - ६१.४३
हिंगणा - ४,२४,१५८ - २,२९,७३३ - ५४.१६
उमरेड - २,९३,८२९ - १,९७,३४१ - ६७.१६
कामठी - ४,६६,२३१ - २,७३,६४१ - ५८.६९
रामटेक - २,७६,४४८ - १,८३,८१६ - ६६.४९
एकूण - २०,४९,०८५ - १२,५०,१९० - ६१.०१ टक्के
 

अशी होईल मतमोजणी 
विधानसभा - फेरी

- काटोल : 17
- सावनेर - 19
- हिंगणा - 23
- उमरेड - 20
- कामठी - 26
- रामटेक - 18

असे आहेत उमेदवार :
राजू पारवे शिवसेना (शिंदे गट)
श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
संदीप मेश्राम (बसपा)
शंकर चहांदे (वंचित बहुजन आघाडी)
किशोर गजभिये (अपक्ष)
आशिष सरोदे (भीमसेना)
उमेश खडसे (राष्ट्र समर्पण पार्टी)
मंजुषा गायकवाड (अखिल भारतीय परिवार पार्टी)
गोवर्धन कुंभारे (वीरों के वीर इंडियन पार्टी)
प्रमोद खोब्रागडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया)
ॲड. भीमराव शेंडे (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी)
भोजराज सरोदे (जय विदर्भ पार्टी)
सिद्धेश्वर बेले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया -ए)
रोशनी गजभिये (गोंडवाना गणतंत्र पार्टी)
विलास खडसे (बहुजन मुक्ती पार्टी)
सिद्धार्थ पाटील पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)
संजय बोरकर (महाराष्ट्र विकास आघाडी)
संविधान लोखंडे (बळीराजा पार्टी)
अजय चव्हाण (अपक्ष)
अरविंद तांडेकर (अपक्ष)
ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष)
कार्तिक डोके (अपक्ष)
गोवर्धन सोमदेवे (अपक्ष)
प्रेमकुमार गजभारे (अपक्ष)
सुरेश लारोकर (अपक्ष)
विलास झोडापे (अपक्ष)
सुनील साळवे (अपक्ष)
सुभाष लोखंडे (अपक्ष)

Web Title: Ramtek Lok Sabha Results 2024 : Congress's Shyamkumar Barve leads in Ramtek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.