राणा दाम्पत्य शनिवारी नागपुरात करणार हनुमानचालिसा पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 22:05 IST2022-05-25T22:04:26+5:302022-05-25T22:05:07+5:30
Nagpur News अमरावती येथील खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा २८ मे रोजी रामनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठन करून महाआरती करणार आहेत.

राणा दाम्पत्य शनिवारी नागपुरात करणार हनुमानचालिसा पठण
नागपूर : अमरावती येथील खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा २८ मे रोजी रामनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठन करून महाआरती करणार आहेत. युवा स्वाभिमान पार्टीचे अमरावती जिल्हाध्यक्ष जितु दुधाने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राणा दाम्पत्य याच दिवशी विमानाने नागपुरात पोहोचणार असून, त्यानंतर रॅलीद्वारे हनुमान मंदिर बाजी प्रभू चौक रामनगर येथे पोहोचतील. महाआरतीनंतर ते भाविकांना हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप करणार आहेत. पत्रकार परिषदेला युवा स्वाभिमान पार्टीचे नागपूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बिसेन, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे, वर्धा जिल्हाध्यक्ष वामन जाधव उपस्थित होते.