स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'रंग दे बसंती', गावागावांत पथनाट्य, जनजागरण
By नरेश डोंगरे | Published: April 23, 2023 02:39 PM2023-04-23T14:39:13+5:302023-04-23T14:40:10+5:30
रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी बेरोजगारांनी काय करावे, कसे करावे, त्याची माहिती कलापथक पथनाट्यातून देत आहे.
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध शासकीय योजनांची माहिती गावागावातील सर्वसामान्य जनतेला व्हावी या उद्देशाने 'रंग दे बसंती' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतिने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गावखेड्यापर्यंत पोहचावी, या उद्देशाने समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा माहिती कार्यालयामार्फत गावागावात पथनाट्य सादर केले जात आहे. रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी बेरोजगारांनी काय करावे, कसे करावे, त्याची माहिती कलापथक पथनाट्यातून देत आहे.
मौदा तालुक्यातील विविध गावांतही या कलापथकाने महिला सशक्तीकरण, शेतकरी कर्ज मुक्ती योजना, स्वाधार योजना, सिंचन योजना, महिला रोजगार, शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, तरुणींसाठी वस्तीगृह, मागासवर्गियांसाठी राबविण्यात येणारी रमाई घरकुल योजना, आंतरधर्मिय विवाह प्रोत्साहन योजना, कन्यादान योजना, आरोग्य विमा योजना आदींची माहिती कलावंतांनी नागरिकांना दिली.