नव्या-जुन्या कविंच्या संगतीत रंगले उ.रा. गिरी कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:55+5:302021-09-06T04:11:55+5:30

नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्यावतीने स्व. उ.रा. गिरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. वि.सा. संघाच्या अमेय दालनात पार ...

Rangale U.R. in the company of old and new poets. Giri Poetry Conference | नव्या-जुन्या कविंच्या संगतीत रंगले उ.रा. गिरी कविसंमेलन

नव्या-जुन्या कविंच्या संगतीत रंगले उ.रा. गिरी कविसंमेलन

googlenewsNext

नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्यावतीने स्व. उ.रा. गिरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. वि.सा. संघाच्या अमेय दालनात पार पडलेल्या या कविसंमेलनात नव्या-जुन्या कविंनी आपल्या रसपूर्ण कवितांचे सादरीकरण केले.

अध्यक्षस्थानी लेखिका व कवयित्री विजया मारोतकर होत्या. यावेळी सुषमा मुलमुले, भारती दवणे, डॉ. पवन कामडी, सना पंडित, डॉ. प्रेमा चोपडे, प्रज्ञा खोडे, डॉ. माधव शोभणे, संजय तिजारे, श्रावणी काशिकर, मंदा वाघमारे, डॉ. वैशाली भांडारकर, शलाका जोशी, डॉ. वसुधा वैद्य, प्रसन्न शेंबेकर, डॉ. साधना सूरकर, ऋचा मांजरखेडे, धनश्री धारकर, अनुराधा हवालदार, रश्मी पदवाड, डॉ. ज्योत्स्ना कदम, डॉ. पुनम चव्हाण, वीणा रणदिवे, अदिती देशमुख, दीपक वाकडे, आनंद देशपांडे, डॉ. मोनाली पोफरे, डॉ. स्वाती धर्माधिकारी या कविंनी सहभाग घेतला. निवेदनाची बाजू ज्योती भगत यांनी सांभाळली. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस विलास मानेकर उपस्थित होते.

............

Web Title: Rangale U.R. in the company of old and new poets. Giri Poetry Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.