दुकान रिकामे करण्यासाठी ‘हायप्रोफाइल’ वसुली; रंगुनवाला भावांची दादागिरी, पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 04:22 PM2023-01-20T16:22:58+5:302023-01-20T16:25:49+5:30

१४ लाखांची बॅग घेऊन काढला पळ

Rangoonwala brothers' 'high profile' money recovery to vacate shop in Sadar Nagpur; police arrested | दुकान रिकामे करण्यासाठी ‘हायप्रोफाइल’ वसुली; रंगुनवाला भावांची दादागिरी, पोलिसांनी केली अटक

दुकान रिकामे करण्यासाठी ‘हायप्रोफाइल’ वसुली; रंगुनवाला भावांची दादागिरी, पोलिसांनी केली अटक

googlenewsNext

नागपूर : दुकान रिकामे करण्याच्या बदल्यात हप्तावसुली करत १४ लाख रुपयांची बॅग घेऊन पळ काढण्यात आला. या प्रकरणात सहभागी असलेला हारिस आरिफ रंगुनवाला व त्याचा भाऊ झैनविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. या दोघांनीही एका रेस्टॉरंटचालकाची फसवणूक करत जिवे मारण्याचीदेखील धमकी दिली.

बोरगाव येथील रहिवासी अर्शद डल्ला (३७) यांनी त्याचा मित्र तुशाद जाल याच्यासोबत सदर येथील जाल कॉम्प्लेक्समध्ये २०१७ साली रेस्टॉरंट सुरू केले होते. या रेस्टॉरंटला एकदा आगदेखील लागली होती व अर्शदने १५ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण केले होते. लॉकडाऊननंतर तुशादने हॉटेल रिकामे करण्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. या कालावधीत हारिस रंगुनावाला डल्ला यांच्या रेस्टॉरंटमध्ये येत होता व त्यांची ओळख झाली. त्याने डल्ला यांना फोन करून तुशादने रेस्टॉरंट रिकामे करण्यासाठी गुंडांना सुपारी दिल्याची माहिती दिली. त्यानंतर डल्ला यांनी तुशादविरोधात दिवाणी खटला दाखल केला.

हारिसने यानंतर मध्यस्थी करून देतो असे म्हणून डल्ला यांच्याशी जवळीक वाढविली. हॉटेल रिकामे करण्याच्या बदल्यात तुषाद १५ लाख रुपये देण्यास तयार आहे, असे त्याने सांगितले. हारिसच्या सांगण्यावरून डल्ला यांनी दिवाणी खटला मागे घेतला. डल्लाच्या रेस्टॉरंटचा ताबा देताना हारिस तेथे पोहोचला. त्याने कोणाला तरी फोन करून 'आम्ही हॉटेल रिकामे करणार नाही, पैलवानांना घेऊन या' असे सांगून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर हारिस, त्याचा भाऊ झैन, वडील आरिफ रंगुनवाला, डल्ला, तुशाद हे वडील धंतोली येथे पोहोचले. तेथे डल्ला यांना दुकान रिकामे करण्याच्या बदल्यात १४ लाख रुपये आणि एक लाखाचा धनादेश मिळाला. झैन याने संधी साधत डल्ला यांच्या हातातील नोटांची पिशवी घेऊन दुचाकीवरून पळ काढला. डल्लाने हारिसला हा प्रकार सांगितल्यावर त्याने चेक घेऊन घरी येण्यास सांगितले. रात्री दहा वाजता डल्ला हारिसच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याने दहा लाख रुपयेच देण्याची तयारी दाखविली. प्रत्यक्षात त्याने सहा लाख रुपयेच दिले.

खंडणी दे अन्यथा गोळ्या घालून जीव घेईन

उर्वरित चार लाख डल्ला यांनी मागितले असता हारिसने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय डल्ला यांनी हारिसच्या सांगण्यावरून भगवाघर चौक येथे हारिसच्या जागेत रेस्टॉरंटचे लाखो रुपयांचे सामान ठेवले होते. ते सामान हवे असेल तर पाच लाख रुपयांची खंडणी दे अन्यथा गोळ्या घालून जीव घेईल, अशी धमकी हारिसने दिली. अखेर डल्ला यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लुटमार, खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.

Web Title: Rangoonwala brothers' 'high profile' money recovery to vacate shop in Sadar Nagpur; police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.