कर्ज फेडत असतानाही घरात तोडफोड करत पैसे पळवले

By योगेश पांडे | Published: May 31, 2024 06:33 PM2024-05-31T18:33:11+5:302024-05-31T18:33:41+5:30

Nagpur : तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Ransacked the house and ran away with the money even while paying the loan | कर्ज फेडत असतानाही घरात तोडफोड करत पैसे पळवले

Ransacked the house and ran away with the money even while paying the loan

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
एका तरुणाने परिचयातील व्यक्तीकडून कर्ज घेतल्यावर त्याच्याकडून नियमितपणे परतफेड सुरू होती. मात्र तरीदेखील संबंधित व्यक्तीने सहकाऱ्यांसह तरुण घरी नसताना घरात घुसून राडा केला व तोडफोड केली. तसेच घरातील पैसेदेखील हिसकावून पळ काढला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

गौरव लबाडे (३७, सूर्यनगर, कळमना) याने २०२१ मध्ये आरोपी अश्विन भास्कर कावळे (२६, ओमनगर) याच्याकडून १ लाख रुपये व्याजाने घेतले होते. गौरव हा वेळोवेळी पैशांची परतफेड करत होता. मात्र २९ मे रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अश्विन हा कुणाल राजू डहाके (२३, चिटणीस नगर, रमनामारोती) व अक्षय उमेश राऊत (२८, रतननगर, रमनामारोती) यांच्यासोबत गौरवच्या घरी पोहोचला. गौरव घरी आहे का अशी त्याने त्याच्या आई रजनी यांना विचारणा केली. त्यानंतर त्याने सहकाऱ्यांसोबत आत घुसून सामानाची तोडफोड सुरू केली व ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमधून ३,२०० रुपये काढून आरोपी निघून गेले. रजनी यांच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Ransacked the house and ran away with the money even while paying the loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.