पोलीस निरीक्षकासह दोघांवर खंडणीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:06 AM2021-03-29T04:06:50+5:302021-03-29T04:06:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात शनिवारी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह दोघांवर ...

Ransom charges against two, including a police inspector | पोलीस निरीक्षकासह दोघांवर खंडणीचा गुन्हा

पोलीस निरीक्षकासह दोघांवर खंडणीचा गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात शनिवारी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. विनोद चौधरी असे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. ते सध्या अजनी पोलीस ठाण्याचे ठाणेदार आहेत. दुसऱ्या आरोपीचे नाव मोहम्मद अश्फाक अली असून, तो गिट्टीखदानमधील मज्जिदाना कॉलनीत राहतो.

फिर्यादीचे नाव राजा जमशेद शरीफ असून, ते गिट्टीखदानमध्ये राहतात. प्रकरण उधारीच्या रकमेचे आहे. राजा शरीफ यांनी त्यांच्या ओळखीच्या अशपाक नामक आरोपीला काही वर्षांपूर्वी रक्कम उधार दिली होती. ती परत मिळावी म्हणून ते प्रयत्नशील होते. त्यातून त्यांचा अश्फाकसोबत वाद झाला. या पार्श्‍वभूमीवर गेल्यावर्षी राजा शरीफ यांना तत्कालीन गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी लकडगंजमधील त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. तेथे चौधरी आणि आरोपी अश्फाक अली या दोघांनी राजाला शिवीगाळ करून मारहाण केली. धमकी दिली आणि त्यांच्या हातातील ब्रेसलेट हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेची तक्रार राजा यांनी पोलिसांकडे नोंदवण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून या प्रकरणात लकडगंज पोलिसांनी सध्या अजनी पोलीस ठाण्यात ठाणेदार असलेले विनोद चौधरी तसेच मोहम्मद अश्फाक अली या दोघांविरुद्ध शिवीगाळ करून, धमकी देणे, मारहाण करून खंडणी वसुलण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली कलम ३२४, ५०६, २८४,३४, ३८४, ५११ नुसार शनिवारी गुन्हा दाखल केला.

---

पोलीस दलात खळबळ

गेल्या काही दिवसांत शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची मालिकाच सुरू झाली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.

---

Web Title: Ransom charges against two, including a police inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.