‘यहा रहना है तो पाच हजार महिना देना होगा’ म्हणत मागितली खंडणी

By दयानंद पाईकराव | Published: June 21, 2023 03:23 PM2023-06-21T15:23:45+5:302023-06-21T15:25:21+5:30

युवकासह वडिलांना मारहाण : एका आरोपीला अटक, एक फरार

Ransom was demanded saying 'Yaha rahna hai to five thousand month dena hoga' | ‘यहा रहना है तो पाच हजार महिना देना होगा’ म्हणत मागितली खंडणी

‘यहा रहना है तो पाच हजार महिना देना होगा’ म्हणत मागितली खंडणी

googlenewsNext

नागपूर : ‘तु यहा कैसे रहने आया, मे यहा का डॉन हु, यहा रहना है तो पाच हजार रुपये महिना देना पडेगा’ असे म्हणून दोन आरोपींनी युवक आणि त्याच्या वडिलांना मारहाण करून खंडणी मागितली. अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे.

गौरव पंकज रगडे (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संकेत जगदिश शंभरकर (वय १९) हा युवक मानवता शाळेजवळ, कुंजीलालपेठ येथे वर्मा यांच्या घरी किरायाने राहतो. तो एका हॉटेलमध्ये शेफचे काम करतो. मंगळवारी २० जूनला सायंकाळी ५.३० वाजता आरोपी गौरव आणि त्याचा साथीदार अर्जुन उर्फ चिनी हे संकेतच्या घरी आले. भिंतीवरून चढून ते संकेतच्या खोलीसमोर आले. त्यांनी दाराला लाथा मारल्यामुळे संकेतने दार उघडले असता आरोपींनी जबरदस्तीने घरात प्रवेश करून संकेतच्या वडिलांना धक्काबुक्की केली.

आरोपींनी संकेतलाही हाताबुक्क्यांनी मारहान केली. आरोपी गौरवने ‘तु यहा कैसे रहने आया, मे यहा का डॉन हु, यहा रहना है तो पाच हजार रुपये महिना देना होगा’ म्हणून खंडणी मागितली. तर आरोपी अर्जुन उर्फ चिनी याने चाकुचा धाक दाखवून संकेतला जीवे मारण्याची धमकी दिली. भितीपोटी संकेतने जवळील ५०० रुपये आरोपींना काढून दिले. त्यानंतर धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेले.

संकेतने दिलेल्या तक्रारीवरून अजनी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप आगरकर यांनी आरोपींविरुद्ध कलम ३८६, २९४, ३२३, ४५२, ५०६ (ब), सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी गौरवला अटक केली असून अर्जुन उर्फ चिनी फरार झाला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध अजनी ठाण्यात आणखी गुन्हे दाखल असल्याची माहिती अजनी पोलिसांनी दिली.

Web Title: Ransom was demanded saying 'Yaha rahna hai to five thousand month dena hoga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.