बलात्कारातील आरोपीला १० वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:59 AM2019-02-03T00:59:02+5:302019-02-03T00:59:51+5:30
सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी. बी. जाधव यांनी शनिवारी हा निर्णय दिला. ही घटना इमामवाडा पोलिसांच्या हद्दीतील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी. बी. जाधव यांनी शनिवारी हा निर्णय दिला. ही घटना इमामवाडा पोलिसांच्या हद्दीतील आहे.
अमर कोमरन्ना पानघटी (२८) असे आरोपीचे नाव असून तो भीमनगर झोपडपट्टी येथील रहिवासी आहे. त्याला कलम ३७६ (२)(एफ) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास तर, कलम ३६३ व ५०६ अंतर्गत प्रत्येकी १ वर्ष कारावास आणि या तिन्ही गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी १००० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना २९ फेब्रुवारी २०१६ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी ९ वर्षे वयाची होती. पोलीस उपनिरीक्षक शीतल हिरोडे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. कल्पना पांडे यांनी बाजू मांडली.