नरखेडमधील बलात्कार प्रकरण : आरोपीला १० वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 01:27 AM2020-10-03T01:27:27+5:302020-10-03T01:28:30+5:30

Rape case, conviction, Nagpur session court विशेष सत्र न्यायालयाने नरखेड येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली.

Rape case in Narkhed: Accused jailed for 10 years | नरखेडमधील बलात्कार प्रकरण : आरोपीला १० वर्षे कारावास

नरखेडमधील बलात्कार प्रकरण : आरोपीला १० वर्षे कारावास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने नरखेड येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला. प्रकाश भैरुराम धरी (२६) असे आरोपीचे नाव असून तो राजस्थान येथील मूळ रहिवासी आहे. ही घटना २०१७ मध्ये घडली. त्यावेळी पीडित मुलगी १६ वर्षे वयाची होती. धरी व्यवसायाने वाहनचालक आहे. तो सावरगाव येथील शेतात ब्लास्टिंगच्या कामासाठी आला होता. दरम्यान, त्याने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. तिला लग्नाचे आमिष दाखवून राजस्थानला बोलावले. त्यानंतर तिला वेगवेगळ्या नातेवाईकांकडे घेऊन जाऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. परंतु, मुलीसोबत लग्न केले नाही. काही दिवसांनी नरखेड पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन दोघांनाही परत आणले. तसेच, मुलीच्या तक्रारीवरून धरीविरुद्ध बलात्कार, अपहरण इत्यादी गुन्हे नोंदवले. प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सत्र न्यायालयाने मुलीचे बयाण व रेकॉर्डवरील अन्य विविध पुरावे लक्षात घेता आरोपीला सदर शिक्षा सुनावली.

Web Title: Rape case in Narkhed: Accused jailed for 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.