लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 11:31 AM2021-10-21T11:31:01+5:302021-10-21T14:37:13+5:30

युवतीला अविवाहित असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले व संबंध प्रस्थापित केले. तो विवाहित असून आपली फसवणूक करत असल्याचे समजताच पिडीतेने तक्रार दाखल केली.

Rape by claiming to be unmarried | लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार

Next

नागपूर : अविवाहित असल्याचे सांगून छत्तीसगडमधील एका युवकाने नागपुरातील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी प्रेमविवाह करून बलात्कार केला. तो विवाहित असल्याचे समजताच तिने तक्रार केली. नंदनवन पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

धवल चेतन सोनी (वय २७, रा. भिलाई छत्तीसगड) असे आरोपीचे नाव आहे. नंदनवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षांची दिव्या (बदललेले नाव) ही नंदनवनमध्ये राहते. ती एका केक शॉपमध्ये काम करते. तर, आरोपी चेतनचे त्याच परिसरात मोबाईल विक्री आणि दुरुस्तीचे दुकान आहे. आरोपी २०१९ मध्ये केक शॉपमध्ये आला होता. त्यानंतर हळू-हळू त्याची दिव्यासोबत ओळख झाली, ओळख मैत्रीत बदलली. आपण अविवाहित असल्याचे सांगून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाची तयारी दाखविल्यामुळे तिनेही त्याला होकार दिला.

लग्न करण्याची बतावणी करून त्याने अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दिव्याने त्याची तिच्या आईशी ओळख करून दिली. तिच्या आईनेही त्याला होकार दिला. आरोपी धवल लग्नाच्या आधीच तिच्या घरी येऊन पत्नीप्रमाणे तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला. तिने लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्याने कोरोनाचा बहाणा करून घरातच तिच्या गळ्यात हार घालून प्रेमविवाह केला.

फेब्रुवारी महिन्यात त्याने दिव्याला आपल्या मूळ गावी न नेता दुर्ग शहरात खोली भाड्याने घेऊन तेथे ठेवले. तिच्याशी अनेकदा त्याने अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले. चेतनच्या या कृत्याची तिला हळू-हळू शंका येऊ लागली, तो विवाहित आहे हे ही तिला समजले. अखेर तिने नंदनवन पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Rape by claiming to be unmarried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.