नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:30 PM2019-05-07T23:30:03+5:302019-05-07T23:31:07+5:30

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे सातत्याने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे.

Rape on girl by showing lacquer marriage in Nagpur | नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल : आरोपीस अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे सातत्याने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे.
मिथुन कैलास उईके (३१) रा. आंबेडकरनगर कंट्रोल वाडी असे आरोपीचे नाव आहे. पीडित २१ वर्षीय तरुणीसोबत आरोपीची फेसबुकवर मैत्री झाली. या मैत्री दरम्यान आरोपी १६ जून २०१८ रोजी पहिल्यांदा तरुणीच्या घरी आला. तेव्हा घरी कुणीही नसल्याचे पाहून त्याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. तो तिला डोंगरगडला घेऊन गेला. तिथे एका मंदिरात तिच्याशी लग्न केले. यानंतर सर्वांसमोर लग्न करण्याचे आश्वासन दिले. यादरम्यान तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू लागला. तरुणीच्या तक्रारीनुसार तिने लग्न करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. मिथुनच्या कुटुंबीयांनी सुद्धा तरुणीशी लग्न करण्यास विरोध केला. नंतर मिथुननेही लग्न करण्यास नकार दिला. तेव्हा तिने पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. १९ फेब्रुवारी २०१९ रोजी पोलिसांनी एनसी दाखल करून तिला न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आरोपीची हिंमत आणखी वाढली होती. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
आरोपीचे मित्रही करायचे पाठलाग
पीडित तरुणीनुसार आरोपीचे काही मित्रही तिचा पाठलाग करू लागले होते. ती घरातून बाहेर निघाली की, आरोपीचे मित्र तिच्या मागे यायचे. बाईकवर आलेले युवक तोंडाला कापड बांधून असायचे. ते तिच्याशी अश्लील बोलून अपमानित करायचे.

Web Title: Rape on girl by showing lacquer marriage in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.