नागपुरात गुंगीचे औषध देऊन बलात्कार : व्हिडीओ क्लीप बनविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:02 AM2019-01-25T00:02:29+5:302019-01-25T00:03:42+5:30
बर्थ डे पार्टीत गुंगीचे औषध प्यायला देऊन एका आरोपीने तरुणीला (वय २७) रिसोर्टवर नेऊन बलात्कार केला. मोबाईलमध्ये त्याचे चित्रण करून त्या आधारे तिला ब्लॅकमेल केले. त्यानंतर वारंवार तो तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. परिणामी तरुणी गर्भवती झाली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने आता तिला वाऱ्यावर सोडले. परिणामी तरुणीने सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बर्थ डे पार्टीत गुंगीचे औषध प्यायला देऊन एका आरोपीने तरुणीला (वय २७) रिसोर्टवर नेऊन बलात्कार केला. मोबाईलमध्ये त्याचे चित्रण करून त्या आधारे तिला ब्लॅकमेल केले. त्यानंतर वारंवार तो तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. परिणामी तरुणी गर्भवती झाली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने आता तिला वाऱ्यावर सोडले. परिणामी तरुणीने सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
समीर अस्मत खान (रा. उद्योग बिल्डींग आशियाना, मोतीबाग)असे आरोपीचे नाव आहे. तो इव्हेंट मॅनेजर असून, तरुणी त्याच्याच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करायची. तरुणीच्या तक्रारीनुसार, २६ ऑक्टोबर २०१७ मध्ये समीरने सदरमधील एका रेस्टॉरंटमध्ये बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत तरुणीलाही त्याने बोलवले होते. खाण्यापिण्याच्या बहाण्याने त्याने तिला गुंगीचे औषध दिले. तिची शुद्ध हरविल्यानंतर त्याने कारमधून तिला नागपूर बाहेर सावनेर मार्गावरच्या एका रिसॉर्टमध्ये नेले. तेथे तिच्यावर बलात्कार करून आरोपीने त्याची व्हिडीओ क्लीप बनविली. तरुणी शुद्धीवार आल्यानंतर त्याने ती क्लीप दाखवून या प्रकाराची वाच्यता केल्यास क्लीप व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीच्या धाकामुळे तरुणी गप्प बसल्याचे पाहून आरोपीने नंतर तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले. तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर तो बलात्कार करू लागला. ती गर्भवती झाल्याने आरोपी समीर खानने तिला लग्नाचे आमिष दाखवले. गर्भवती असताना देखिल तरुणीसोबत त्याचे शरीरसंबंध प्रस्थापित करणे सुरूच होते. १८ जानेवारीला रात्री याच उद्देशाने तो तिच्याकडे आला. यावेळी लग्नाचा विषय काढताच त्याने लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्यावरून या दोघांत कडाक्याचे भांडण झाले. तो लग्न करायला तयार नसल्याने तिने सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी समीर खानविरुद्ध बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपासोबतच अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
कारमध्येच शरिरसंबंध !
लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे तरुणी त्याच्यासोबत ईकडे तिकडे फिरत होती. तो तिला त्याच्या कारने वेगवेगळ्या भागात न्यायचा आणि कारमध्येच तिच्यावर बलात्कार करायचा. तरुणीने तिच्या तक्रारीतही हा प्रकार नमूद केला आहे.