प्रेमसंबंधांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 09:13 PM2021-05-19T21:13:33+5:302021-05-19T21:14:34+5:30
Rape of a minor girl प्रेमसंबंधांचे आमिष दाखवून एका युवकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. हिंगणा पोलिसांनी बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेमसंबंधांचे आमिष दाखवून एका युवकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. हिंगणा पोलिसांनी बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आकाश पुरुषोत्तम उरिया (२४) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी आकाश हा बँकेत एक्झिक्युटिव्ह आहे. त्याचे वडील वाहनचालक आहेत. ते बहुतांश बाहेरच राहतात. आकाशचा एक वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनीच पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागला. हा वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला. यामुळे पत्नी माहेरी निघून गेली. घरी आकाश व त्याची आई राहते. पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही दहावीची विद्यार्थिनी आहे. ती आकाशच्या शेजारीच राहते. नोव्हेंबर महिन्यात तिची आकाशसोबत पहिल्यांचा बोलाचाली झाली. आकाशने तिला बँकेत मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच तो तिच्यावर प्रेम करीत असल्याचे सांगितले. यानंतर दोघांमध्ये संपर्क वाढला. एप्रिल महिन्यात आकाशने पीडित मुलीला रात्री आपल्या घरी बोलावले. पीडित मुलगीही त्याच्या घरी गेली. आरोपीने तिथे तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर, जेव्हा कधी वेळ मिळेल, तो तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला.
काही दिवसांनी मुलीचे मन अभ्यासात लागत नव्हते. ती सातत्याने आकाशच्या घराकडेच पाहत असायची. आईला संशय आला. तिने मुलीला मावशीच्या घरी पाठवले. मावशीने विचारपूस केली असता पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मंगळवारी हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आकाशला अटक केली.
बॉक्स
भावाच्या मित्रानेच केली छेडखानी
कळमन्यात भावाच्या एका मित्रानेच बहिणीची छेडखानी केल्याचा प्रकार उघडकीस आला. शहनवाज रबाबनी (२०) असे आरोपीचे नाव आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या भावासोबत आरोपीची मैत्री आहे. मंगळवारी रात्री अल्पवयीन मुलगी आपल्या बाल्कनीत उभी होती. आरोपीने तिला खाली बोलावले आणि तिच्याशी आपत्तीजनक वर्तन केले. कळमना पोलिसांनी छेडखानी व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.