अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्षे कारावास; सत्र न्यायालयाचा निर्णय  

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: January 30, 2024 06:35 PM2024-01-30T18:35:17+5:302024-01-30T18:35:36+5:30

अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला मंगळवारी २० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली.

Rape of minor girl, accused sentenced to 20 years imprisonment Decision of Sessions Court | अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्षे कारावास; सत्र न्यायालयाचा निर्णय  

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्षे कारावास; सत्र न्यायालयाचा निर्णय  

नागपूर: अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला मंगळवारी २० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली व एकूण चार हजार १०० रुपये दंड ठोठावण्यात आला. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी हा निर्णय दिला. ही घटना पारशिवनी तालुक्यातील आहे. अतुल वामन मेश्राम (३०) असे आरोपीचे नाव असून तो सिहोरा येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १३ वर्षे ९ महिने वयाची होती. ती इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होती. ऑगस्ट-२०१९ मध्ये मुलगी एकटीच घरी होती.

दरम्यान, आरोपीने तिच्या घरात प्रवेश केला आणि आई व भावाला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी भितीमुळे गप्प राहिली. त्यामुळे आरोपीचे धाडस वाढले. तो वारंवार मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार करू लागला. परिणामी, मुलीला गर्भधारणा झाली. ३ फेब्रुवारी २०२० रोजी तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात नेले असता ही बाब उघड झाली. दरम्यान, मुलीने आपबिती सांगितली. त्यानंतर आरोपीविरुद्ध कन्हान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीवरील गुन्हे सिद्ध केले.

Web Title: Rape of minor girl, accused sentenced to 20 years imprisonment Decision of Sessions Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.