नागपूरच्या हुडकेश्वरमधील शाळकरी मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:11 AM2018-05-27T00:11:04+5:302018-05-27T00:11:17+5:30

शाळकरी मुलीला (वय १५) नातेवाईकांच्या भेटीला नेतो, असे सांगून कारंजा लाडमध्ये राहणाऱ्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. १७ ते २१ मे दरम्यान हा गुन्हा घडला. ईश्वर विजय दोडके (वय २०) असे आरोपीचे नाव असून तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी आहे.

Rape on school girl in Hudkeshwar, Nagpur | नागपूरच्या हुडकेश्वरमधील शाळकरी मुलीवर बलात्कार

नागपूरच्या हुडकेश्वरमधील शाळकरी मुलीवर बलात्कार

Next
ठळक मुद्देआरोपी कॅटर्सचे काम करणारा

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर - शाळकरी मुलीला (वय १५) नातेवाईकांच्या भेटीला नेतो, असे सांगून कारंजा लाडमध्ये राहणाऱ्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. १७ ते २१ मे दरम्यान हा गुन्हा घडला. ईश्वर विजय दोडके (वय २०) असे आरोपीचे नाव असून तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी आहे. नागपुरात तो कॅटरर्सचे काम करतो. तो हुडकेश्वरमध्ये भाड्याने राहत होता. पीडित मुलीचे नातेवाईक त्याच्या कारंजा येथील घराजवळ राहतात. त्यामुळे त्याची पीडित मुलगी आणि तिच्या आईवडिलांसोबत ओळख आहे. यातून त्याचे पीडित मुलीच्या घरी जाणे-येणे होते. त्याने मुलीच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केल्यानंतर मुलीला नातेवाईकांच्या घरी भेटीसाठी नेतो म्हणून १७ मे रोजी सकाळी ७ वाजता आपल्या सोबत नागपूरहून कारंजाला नेले. तेथे त्याने मुलीला धाक दाखवून तिच्यावर २१ मेपर्यंत वारंवार बलात्कार केला. त्यानंतर त्याने मुलीच्या नातेवाईकांची भेट न घालवून देताच तिला यवतमाळ येथे नेऊन सोडले. पीडित मुलगी तेथून आपल्या घरी कशीबशी नागपुरात पोहचली. येथे आल्यानंतर मुलीने आरोपीकडून झालेल्या अत्याचाराची माहिती आईवडिलांना दिली. त्यामुळे मुलीच्या आईवडिलांनी आरोपी दोडकेला विचारणा केली. दोडकेने त्यांच्याशी वाद घालून त्यांना अश्लील शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पीडित मुलीने या प्रकरणाची तक्रार हुडकेश्वर ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी बलात्कार, तसेच पोक्सो कायद्याच्या कलमान्वये आरोपी दोडकेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Rape on school girl in Hudkeshwar, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.