लैंगिक शोषण की बलात्कार? पिडितेने अडकविले चारजणांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 02:10 PM2021-03-25T14:10:25+5:302021-03-25T14:10:45+5:30
Nagpur news प्रेम संबंधात अल्पवयिन विद्याथीर्नीचे यौनशोषण झाले. विद्याथीर्नी गर्भवती झाल्याने प्रकरण पुढे आले. पिडितेकडून दिशाभूल केली जात असल्याने पोलीसांना प्रकरणाचा छडा लावण्यात समस्या उत्पन्न होत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेम संबंधात अल्पवयिन विद्याथीर्नीचे यौनशोषण झाले. विद्याथीर्नी गर्भवती झाल्याने प्रकरण पुढे आले. पिडितेकडून दिशाभूल केली जात असल्याने पोलीसांना प्रकरणाचा छडा लावण्यात समस्या उत्पन्न होत होती.
१६ वर्षीय पिडित विद्याथीर्नीची एका तरुणासोबत मैत्री आहे. तरुणाने विवाहाचे आमिष दाखवून विद्याथीर्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विद्याथीर्नीने याबाबत कुटूंबीयांकडे कधीच वाच्यता केली नाही. दरम्यान विद्याथीर्नीला दिवस राहिले. तिची वागणूक शंकास्पद दिसल्याने कुटूंबीयांनी तिला १९ मार्च रोजी डॉक्टरांकडे नेले. तेथे ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. विद्याथीर्नीचा गर्भपातही झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मंगळवारी हॉस्पिटलने मानकापूर पोलीसांना सूचना दिली. त्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला.
पोलीसांनी विद्याथीर्नी व तिच्या आईची चौकशी केली. विद्याथीर्नीने वेगवेगळ्या मागार्ने पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संध्याकाळच्या वेळी ती पायदळ जात असताना, मानकापूर परिसरात नाल्याजवळ एका बाईकस्वाराने तिला रोखले. जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. त्यानंतर बेशुद्धावस्थेत त्या युवकाने तिच्यासोबत बलात्कार केल्याचे तिने सांगितले. घाबरल्यामुळे या घटनेबद्दल कुणालाच सांगितले नसल्याचे ती सांगत होती. तिच्या आईनेसुद्धा अधिक माहिती नसल्याचे सांगितले. पोलीसांना विद्याथीर्नीच्या वक्तव्यावर शंका उपस्थित झाली. पोलीसांनी बलात्कार व पॉक्सो अंतर्गत प्रकरणाची नोंद केली आणि मोबाईलचा तपास सुरू केला. यातून तिन ते चार युवकांवर शंका उत्पन्न झाली. पोलीसांनी सर्वांनाच ठाण्यात आणले. त्यानंतर एका युवकासोबत तीचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले. पोलीसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत चौकशी सुरू होती.
...............