नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 08:56 PM2018-08-25T20:56:28+5:302018-08-25T20:57:13+5:30

मोबाईल टॉवरच्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ आॅगस्टच्या दुपारी हा गुन्हा घडला.

Rape by showing lure for employment | नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बलात्कार

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बलात्कार

googlenewsNext
ठळक मुद्देलग्नास नकार : नंदनवनमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईल टॉवरच्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ आॅगस्टच्या दुपारी हा गुन्हा घडला.
आरोपीचे नाव राहुल ठाकरे (वय २५) आहे. तो वाठोड्यात राहतो. आपण मोबाईल टॉवर कंपनीत अधिकारी असून, तरुणींना नोकरी लावून देऊ शकतो, असे सांगून ११ आॅगस्टला पीडित तरुणीच्या (वय २०) घरी गेला. तेथे त्याने तरुणीच्या आईचा विश्वास संपादन करून तरुणीला लगेच नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे आईने त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीला कागदपत्रे घेऊन ११ आॅगस्टला त्याच्या दुचाकीवर बसवून त्याच्या आॅफिसला पाठविले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ आॅगस्टला तो पुन्हा तिच्या घरी आला. त्याने पुन्हा तरुणीला आपल्या दुचाकीवर बसवून चांदमारी परिसरात नेले. तेथे एका मित्राच्या खोलीवर नेऊन तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकीही दिली. तरुणीने घरी परत आल्यानंतर तिने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. आईने आरोपीला फोनवर विचारणा केली असता, त्याने आपण एकाच जातीचे आहोत असे सांगून, तरुणीसोबत लग्न करण्याची तयारी दाखविली. बदनामी आणि मुलीच्या भविष्याचा विचार करून महिलेने झाले गेले विसरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता महिलेने आरोपी राहुल ठाकरेला लग्नाबद्दल विचारणा केली असता, त्याने स्पष्ट नकार देऊन तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, असे म्हटले. त्यामुळे महिला आणि तिची मुलगी नंदनवन ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी पोहोचली. ठाणेदार विनायक चव्हाण यांनी मुलीची तक्रार ऐकून घेतल्यानंतर आरोपी राहुल ठाकरेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

पत्ता खोटा सांगितला?
आरोपी राहुलने मुलीच्या आईला दिलेल्या पत्त्यावर पोलीस पोहोचले असता, तो तेथे आढळला नाही. त्याने त्याचा राहण्याचा पत्ताही खोटा सांगितल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

 

Web Title: Rape by showing lure for employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.