नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 09:46 PM2018-11-17T21:46:06+5:302018-11-17T21:49:24+5:30

१७ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर सतत तीन दिवस शारीरिक संबंध जोडले. नंतर तिला घरून पळून जाऊ, असे म्हणत स्वत:चे कपडे व साहित्य घेऊन बोलविले. स्वत: मात्र नमूद ठिकाणी आलाच नाही. परिणामी नागरिकांच्या मदतीने युवतीने पोलीस ठाणे गाठून आरोपी वैभव विलास तुपटे (वय २३) विरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली.

Rape on a woman by showing lure of marriage in Nagpur | नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार

Next
ठळक मुद्देघरून पळून जाण्यासाठी बोलविले : स्वत: बेपत्ता झालागिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १७ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर सतत तीन दिवस शारीरिक संबंध जोडले. नंतर तिला घरून पळून जाऊ, असे म्हणत स्वत:चे कपडे व साहित्य घेऊन बोलविले. स्वत: मात्र नमूद ठिकाणी आलाच नाही. परिणामी नागरिकांच्या मदतीने युवतीने पोलीस ठाणे गाठून आरोपी वैभव विलास तुपटे (वय २३) विरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली.
आरोपी तुपटे हा मूळचा बेळगाव, ता. ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. तो दाभा परिसरात एका कामावर रोजमजुरी करतो. पीडित युवतीची आईदेखील त्याच ठिकाणी काम करते. त्यामुळे युवतीच्या आईसोबत त्याची ओळख आहे. त्यातून तो चार दिवसांपूर्वी युवतीच्या घरी आला. तिच्या आईसोबत बोलता बोलता त्याने आपला मोबाईल नंबर एका कागदावर लिहून तो कागद युवतीला दिला. सायंकाळी फोन कर, असे तो म्हणाला. त्यानुसार, १३ नोव्हेंबरला सायंकाळी युवतीने तुपटेला फोन केला. त्याने तिला दाभा परिसरात एका ठिकाणी भेटायला बोलविले. तेथे युवती पोहचल्यावर त्याने तिला प्रपोज केले. मला तू खूप आवडते, तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून त्याने तिचा होकार मिळवला. त्यानंतर तिला अंधाऱ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शरीरसंबंध जोडले. ती जाळ्यात अडकल्याची खात्री पटल्याने आरोपीने पुढचे तीन दिवस तिच्यावर ठिकठिकाणी नेऊन बलात्कार केला. गुरुवारी त्याने तिला मित्राच्या फ्लॅटवर नेले. तेथे तिच्यावर त्याने बलात्कार केला. यावेळी युवतीने त्याला विरोध करून लग्नाबाबत विचारले असता त्याने तिला ‘तू तुझे कपडे घरून घेऊन ये, आपण पळून जाऊन लग्न करू’ , असे म्हटले. त्याच्यावर विश्वास ठेवून युवतीने तिचे कपडे व आवश्यक चीजवस्तू सोबत घेतल्या. ती आरोपी तुपटेने बोलविल्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी वाडीतील सोनबानगर चौकात पोहचली. सायंकाळ झाली तरी आरोपी तिला घ्यायला आला नाही. त्यामुळे तिने त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. यावेळी त्याने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा युवतीचे अवसान गळाले. ती जोरजोरात रडू लागली. त्यामुळे बाजूची मंडळी गोळा झाली. त्यांनी तिला धीर देत विचारपूस केली असता तिने त्यांना आपबिती सांगितली.
नागरिकांनी तिला वाडी पोलिसांकडे पोहचवले. वाडी पोलिसांनी घटनाक्रम गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीतील असल्याचे सांगून तिला तिकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, युवतीने शुक्रवारी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी तुपटेविरुद्ध बलात्काराचे कलम ३७६ (२) तसेच पोक्सो कायद्यानुसार सहकलम ४, ८ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Rape on a woman by showing lure of marriage in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.