बिर्याणी खाऊ घालून नागपुरात तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:34 PM2018-01-13T23:34:21+5:302018-01-13T23:37:55+5:30

ओळखीच्या तरुणीला (वय २५) गुंगीचे औषधयुक्त बिर्याणी खाऊ घालून आरोपी मनोज बावनेर (वय २७, रा. केजीएन सोसायटी, गिट्टीखदान) याने बलात्कार केला.

Rape on a young lady in Nagpur by giving for eat biryani | बिर्याणी खाऊ घालून नागपुरात तरुणीवर बलात्कार

बिर्याणी खाऊ घालून नागपुरात तरुणीवर बलात्कार

Next
ठळक मुद्देगिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओळखीच्या तरुणीला (वय २५) गुंगीचे औषधयुक्त बिर्याणी खाऊ घालून आरोपी मनोज बावनेर (वय २७, रा. केजीएन सोसायटी, गिट्टीखदान) याने बलात्कार केला. त्यानंतर माफी मागण्याच्या बहाण्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला आणि लग्नाचे आमिष दाखवून तिला गप्प केल्यानंतर आता आरोपीने लग्नास नकार दिला.
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, २ डिसेंबर २०१७ ला रात्री ८.३० च्या सुमारास तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी मनोज तिच्या घरात आला. तिला बिर्याणी आणून खाऊ असे तो म्हणाला. तिने होकार दिल्यानंतर मनोजने बाहेरून बिर्याणी आणली. ती खाल्ल्यानंतर तिची शुद्ध हरपली. त्याअवस्थेत मनोजने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दुसऱ्या  दिवशी पुन्हा मनोज तिच्या घरी माफी मागण्याच्या बहाण्याने गेला. यावेळी ती शांत असल्याचे पाहून त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. तिने पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्यामुळे त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शांत केले. त्यानंतर तो तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध जोडू लागला. ती आता गर्भवती झाली. तिने मनोजला हे सांगून तातडीने लग्न करू असे म्हटले. मात्र, आरोपीने तिला लग्नास नकार देऊन वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरुणीने गिट्टीखदान ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदवली.
आरोपी गजाआड
पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपी मनोजला अटक करण्यात आली आहे. तो खासगी नोकरी करतो.

Web Title: Rape on a young lady in Nagpur by giving for eat biryani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.