लग्नाचे आमिष दाखवून आधी शरीरसंबंध नंतर टाळाटाळ, गर्भवतीने दिली बलात्काराची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 13:46 IST2021-12-29T13:40:40+5:302021-12-29T13:46:44+5:30
लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती ३ महिन्यांची गर्भवती असताना तिच्यापासून दुरावा करीत दुसरीशी लग्नाची तयारी सुरू केली. याबाबत कळताच गर्भवती प्रेयसीने सक्करदरा पोलिसात तक्रार दाखल केली.

लग्नाचे आमिष दाखवून आधी शरीरसंबंध नंतर टाळाटाळ, गर्भवतीने दिली बलात्काराची तक्रार
नागपूर : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार करून गर्भवती केल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या आरोपीविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तक्रार करणारी महिला २८ वर्षांची आहे. आरोपीचे नाव शेख शहजाद शेख गफ्फार (२६, रा. सक्करदरा) असे आहे. माहितीनुसार, पीडित तरुणीचे लग्न झाले होते. मात्र, दोन वर्ष सुखी संसार केल्यानंतर तिचे एकाशी प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे ती पतीला सोडून माहेरी आली. माहेरी आल्यानंतर ती शेख शहजादकडे कामाला लागली. या दरम्या तीचे शहजादशी सुत जुळले. अविवाहित असलेल्या शहजादने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि १ फेब्रुवारी २०२० ते ३० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती तीन महिन्यांची गर्भवती झाली.
तिने आरोपी शहजादकडे लग्नाचा तगादा लावला. परंतु, तो टाळाटाळ करीत होता. दरम्यान, त्याला बघायला स्थळ यायला लागली. यामुळे, महिलेने त्याला लग्नाची गळ घातली यावरुन दोघांत ३० ऑक्टोबरला कडाक्याचे भांडण झाले. त्याने लग्नास नकार दिल्यामुळे महिलेने सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात आरोपी शहजादविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.