नागपुरातअल्पवयीन मुलाचा चिमुकलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:18 PM2018-06-27T22:18:34+5:302018-06-27T22:20:17+5:30
एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने खेळता खेळता चार वर्षाच्या चिमुकलवर अत्याचार केला. गिट्टीखदान परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकही आश्चर्यचकित झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने खेळता खेळता चार वर्षाच्या चिमुकलवर अत्याचार केला. गिट्टीखदान परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकही आश्चर्यचकित झाले आहेत.
शेजारी असल्याने चिमुकली मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता मुलाच्या घरी खेळासाठी गेली होती. ‘लपवा-छपवी’ खेळत असताना मुलगा चिमुकलीला बाथरुममध्ये घेऊन गेला. तिथे तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. चिमुकली घाबरली. तिने घरी येऊन आईला घडलेला प्रकार सांगितला. घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
युवकाला जखमी करून लुटले
गणेशपेठ येथे लुटारुंनी चाकूने वार करून एका युवकाला जखमी करून लुटले. ही घटना सोमवारी सकाळी १० ते १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
चंद्रपूर येथील रहिवासी २३ वर्षीय सुरेश वेबे हा २५ जून रोजी कामानिमित्त एसटी बसने नागपूरला आला होता. तो एसटी बस स्थानकावर मोबाईलवर कुटुंबीयांशी बोलत होता. त्याचवेळी बाईकवर दोन युवक आले आणि ते मोबाईल हिसकावून पळू लागले. सुरेशने लगेच एका बाईक चालकास सांगितले आणि त्याच्यासोबत चोरांचा पाठलाग करू लागला. गांधी गेटजवळ आरोपी आढळून आले. सुरेशने आरोपीला मोबाईल परत मागितला, तेव्हा आरोपींनी चाकूने त्याच्यावर हल्ला केला. त्याला गंभीर जखमी करून फरार झाले. सुरेशने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
लॉकर कर्मचाऱ्याने केला अपहार
खासगी लॉकरच्या कर्मचाऱ्याने ३ लाख ८१ हजार रुपयाचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रवीण दिवाकर मोहाडीकर (३२) रा. वाठोडा असे आरोपीचे नाव आहे.
सेंट्रल एव्हेन्यू येथील रहिवासी विशाल पारेख यांचे सराफा बाजरात भारत सेफ डिपॉजिट व्हॉल्ट आहे. या फर्ममध्ये प्रवीण अकाऊंटंट आहे २०१६ ते २०१७ दरम्यान प्रवीणने फर्मचे ३ लाख ८१ हजार रुपये बँकेत जमा करण्याऐवजी परस्पर लंपास केले. याची माहिती होताच पारेख यांनी त्याला विचारपूस केली. तेव्हा प्रवीण टाळाटाळ करीत असल्याने पारेख यांनी तहसील पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.